उन्हाची झळ, दुधाची आवक घटली, मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 10:32 PM2018-04-14T22:32:05+5:302018-04-14T22:32:05+5:30
उन्हाळ्याच्या दिवसांत हिरव्या चाऱ्याचा अभाव, उष्णेचे वाढते प्रमाण यामुळे दुधाळू जनावरांना पोषक वातावरण मिळू शकत नाही. त्यामुळे दुधाची आवक कमी होते.
अमरावती : उन्हाळ्याच्या दिवसांत हिरव्या चाऱ्याचा अभाव, उष्णेचे वाढते प्रमाण यामुळे दुधाळू जनावरांना पोषक वातावरण मिळू शकत नाही. त्यामुळे दुधाची आवक कमी होते. मात्र सद्यस्थितीत दुग्ध विकास संस्थांकडून शासकीय दुग्ध विकास यंत्रणेला रोेज अंदाजे साडेचार हजार लीटर दुधाचा पुरवठा होत असला तरी मे महिन्यात बाहेरील खासगी डेऱ्यांची दुधाची मागणी वाढत असल्याने शासकीय दुग्ध विकास यंत्रणकडे आवक आपसुक घटण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
सद्यस्थितीत साडेचार ते पाच हजार लीटर दुधाची आवक आहे. परंतु, मे महिन्यात पाचशे लीटरने प्रतिदिन दुधाची घटण्याची शक्यता आहे. शासकीय दूग्ध विकास यंत्रणेकडे जरी दुधाची रोजची आवक साडेचार हजार लीटरची असली तरी ज्या काही नोंदणीकृत संस्था आहेत, त्यांचा जिल्ह्याला पुरवठा ४४ ते ४५ हजार लीटरचा होतो. जिल्हा संघाच्यावतीने साडेतीन हजार लीटर दुधाचा पुरवठा होेतो, तर तालुका संघाच्यावतीने १६०० ते १८०० लिटर दूधाचा पुरवठा शासकीय यंत्रणेला करण्यात येतो. या दुधावर पक्रिया होऊन पाकीटबंद शासकीय दूध विक्रीसाठी जाते.
तीन रूपये अधिक भाव मिळत असल्याचा दावा
खासगी डेअरीकडे दूध उत्पाक मोठ्या प्रमाणात दुधाची विक्री करताना दिसत आहे. कारण त्यांना शासकीय यंत्रणेपेक्षा दुधाचे दर चांगले मिळत आहे. पण या सिजनला दुधाची आवक चांगली आहे. त्या तुलनेत खासगी डेअरीचालकांना चांगला भाव मिळत नाही. खासगीपेक्षा तीन ते चार रूपयांनी शासकीय यंत्रणेकडे चांगला भाव मिळत असल्याने उन्हाळा असतानाही सद्यस्थित आवक चांगली आहे. ३.५ फॅट व ८.५ (एसएनएफ) सोलिड नॉट फॅटसाठी शासकीय २७ रूपये प्रतिलिटर दर मिळत आहेत. खासगीत २२ ते २४ रूपये लीटर, तर ६.० फॅट व ९.० एसएनएफसाठी शासकीय ३६ रूपये प्रतिलीटर, तर खासगीत ३२ ते ३३ रूपये दर मिळत असल्याची माहिती आहे.
लस्सीसाठी दुधाची मागणी वाढली
अंबानगरीत अनेक परप्रांतीय व्यवसायिकांनी शीतपेय व लस्सीची दुकाने थाटली आहेत. लस्सी निर्मितीसाठी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून चढ्या दराने दूध विकत घेण्यात येत आहे. त्यामुळे पुढील महिन्यात शासकीय यंत्रणेकडे अचानक दुधाची आवक घटणार आहे. पण, त्याचा परिणाम जास्त दिवस जाणवणार नसल्याचे दुग्ध विकास यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सद्दस्थितीत दुधाची आवक अशंत: कमी झाली. खासगी दूध विकत घेणाºयांपेक्षा तीन ते चार रूपयांनी नोंदणीकृत दूध पुरवठा करणाऱ्यां दुधाचे शासकीय भाव जास्त आहे.
- संपत जांभुळे,
जिल्हा दुग्ध विकास व्यवसाय अधिकारी, अमरावती