गोड वाणी अन् संयमी वृत्ती लोकाभिमुख प्रशासनाची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:33 PM2019-01-22T22:33:15+5:302019-01-22T22:33:42+5:30

संयमी वृत्ती आणि गोड वाणी यांचा थेट संबंध लोकाभिमुख प्रशासनाशी आहे, असा अनुभव राज्याच्या बांधकाम खात्याचे सचिव धनंजय धवड यांनी ‘लोकमत’च्या वाचकांसाठी उलगडला.

Sweet voice and restraint attitude | गोड वाणी अन् संयमी वृत्ती लोकाभिमुख प्रशासनाची ओळख

गोड वाणी अन् संयमी वृत्ती लोकाभिमुख प्रशासनाची ओळख

Next
ठळक मुद्देधनंजय धवड : 'गव्हर्न्मेंट सर्व्हंट' नव्हे 'पब्लिक सर्व्हंट'

अमरावती - संयमी वृत्ती आणि गोड वाणी यांचा थेट संबंध लोकाभिमुख प्रशासनाशी आहे, असा अनुभव राज्याच्या बांधकाम खात्याचे सचिव धनंजय धवड यांनी ‘लोकमत’च्या वाचकांसाठी उलगडला.
शिकून अभियंता झाल्यानंतर एमपीएससीत अव्वल स्थानी आलेल्या धनंजय धवड यांनी राज्याच्या बांधकाम खात्यात सचिवपदापर्यंतचा दिमाखदार प्रवास यशस्वीपणे पार केला. ज्यांच्या निर्णयक्षमतेमुळे बांधकाम खात्यात अनेक लोकभिमुख मापदंड निर्माण होऊ शकले, ते धनंजय धवड सांगतात, संयम आणि आश्वस्त वाणीमुळे आगंतुक व्यक्तीचा प्रश्न सर्वंकषपणे समजून घेता येतो. प्रश्न सर्व कोणांतून कळला की, प्रकरणाचा आवाका कळतो. त्यामुळे निर्णयप्रक्रिया सुटसुटीत व सोपी होते. कायद्याच्या चौकटीत निर्णय घेता येतात. त्या कामांसंबंधी सहकाऱ्यांना सूचना द्यावयाच्या असतील तर त्या अचूकपणे देता येतात. हा झाला प्रशासकीय लाभ. त्याशिवाय जी व्यक्ती दूर अंतराहून वेळ आणि पदरचे पैसे खर्चून आलेली असते, तिच्या येण्याचेही सार्थक होते. लोकाभिमुख प्रशासन म्हणतात ते हेच! विसंवादाऐवजी सुसंवाद फुलविण्याची, प्रशासनपालिकेचे सामर्थ्य वाढविण्याची ताकद गोड वाणीत आहे.

बांधकाम खात्यात सचिवपदापर्यंत पोहोचूनही स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखले जाणारे धनंजय धवड यांना नवागत अधिकाऱ्यांसाठी संदेश विचारल्यावर ते म्हणतात, ज्यांना प्रशासकीय सेवेत येण्याची इच्छा आहे, त्यांनी स्वत:ला 'गव्हर्न्मेंट सर्व्हंट' ऐवजी 'पब्लिक सर्व्हंट’ समजावे. प्रशासकीय सेवेत येण्याचा उद्देश आपसूक पूर्णत्वास जाईल.

Web Title: Sweet voice and restraint attitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.