ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा होणार कमी; साखरेच्या भावात काहीशी वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:16 AM2021-08-14T04:16:21+5:302021-08-14T04:16:21+5:30
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा : श्रावण महिन्यात सणवारांना घरोघरी गोड-धोड करण्याची पूर्वापार परंपरा आहे. या महिन्यापासून पुढे साखरेच्या मागणीत वाढ ...
श्यामकांत सहस्त्रभोजने
बडनेरा : श्रावण महिन्यात सणवारांना घरोघरी गोड-धोड करण्याची पूर्वापार परंपरा आहे. या महिन्यापासून पुढे साखरेच्या मागणीत वाढ होत असते. नुकतेच काहीसे दर वधारल्याने त्याचा फटका सणासुदीच्या काळात बसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच त्याचा गोडवा कमी होणार की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
श्रावण महिन्यात नागपंचमी, पतेती, स्वातंत्र्यदिन, मोहरम, मंगळागौरी पूजन, श्रीकृष्ण जयंती, पोळा असे सण लागोपाठ येतात. सणांच्या दिवशी गोड पदार्थ केले जातात. पर्यायाने या महिन्यापासून साखरेच्या मागणीत वाढ होण्यास सुरुवात होते. गेल्या आठ दिवसांपूर्वीच क्विंटल मागे ७५ रुपये वाढ झाल्याचे एका दुकानदाराने सांगितले. घरोघरी गोड पदार्थ तसेच नियमित होत असलेल्या चहामुळे साखरेचा वापर बराच होत असतो. साखरेचा वापर जास्त होत असल्याने लोकांना त्याच्यावर अधिक पैसे मोजावे लागतात. आधीच महागाईच्या कचाट्यात लोक सापडले आहेत. साखरेचा वापर जास्त होत असल्याने घरातील नियोजित आर्थिक बजेट सणासुदीच्या महिन्यात अधिकच बिघडले आहे. साखर दोन प्रकारात विकली जाते, जाडी आणि बारीक. त्याच्या भावातदेखील काहीसा फरक असतो. ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा साखरेच्या महागाईमुळे कमी झाला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. लोकांवर दिवसेंदिवस महागाईचा बोजा वाढताच आहे. किलोमागे वेगवेगळ्या दुकानांमध्ये साखरेच्या भावात फरक पाहावयास मिळतो. कुठे ३६, ३७ तर कुठे ३८ रुपये असे भाव आहेत.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
बॉक्स:
का वाढले भाव?
साखरेचा व्यापार करणारे तसेच चिल्लर दुकानदारांच्या मते, या वर्षात साखरेच्या दरात तशी फारशी वाढ झाली नाही. गेल्या काही दिवसात अत्यल्प दरवाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात साखरेची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात होत असते. मागणीत वाढ झालेली पाहावयास मिळते आहे. तसेही अशा दिवसांमध्ये मागणीच्या तुलनेत नेहमीच काहीशी दरवाढ होत असल्याचे पाहावयास मिळते.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
* महिन्याचे बजेट वाढले.....
प्रतिक्रिया-
1) श्रावण महिना म्हटला की, सणवारांना प्रारंभ होते. या दरम्यान विविध सणांवर घरोघरी स्वयंपाकामध्ये गोड पदार्थ केले जातात. यामुळे साखरेचे काहीसे भाव वाढले आहेत. सणासुदीच्या काळात दरवाढ केली जाऊ नये.
- सुषमा योगेश निमकर
गृहिणी.
2) साखरेच्या भावात वाढ झाल्यास त्याचा आर्थिक फटका सणवाराच्या महिन्यात घरोघरी बसतो. यादरम्यान साखरेचा वापर अधिक प्रमाणात होत असतो. महागाईवर नियंत्रण असणे गरजेचे आहे.
- मंजुश्री मंगेश गाले, गृहिणी.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
* जिल्ह्याला दररोज लागते साखर*
साडे तीन लाख क्विंटल
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
*साखरेचे दर याच वर्षातील (प्रति किलो)
जानेवारी - ३७ रुपये
फेब्रुवारी - ३७ रुपये
मार्च - ३६ रुपये
एप्रिल - ३६ रुपये
मे - ३७रुपये
जून - ३६ रुपये
जुलै - ३६ रुपये
ऑगस्ट - ३७ रुपये
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^