‘स्वाईन फ्लू’ : सीएस पोहोचले वरुडला

By admin | Published: September 5, 2015 12:09 AM2015-09-05T00:09:52+5:302015-09-05T00:09:52+5:30

वरूड शहरात स्वाईन फ्लूने गुरुवारी एक वृध्द दगावल्याने खळबळ उडाली.

'Swine Flu': CS reached Baroda | ‘स्वाईन फ्लू’ : सीएस पोहोचले वरुडला

‘स्वाईन फ्लू’ : सीएस पोहोचले वरुडला

Next

डॉक्टर आणि रुग्णांशी चर्चा
अमरावती : वरूड शहरात स्वाईन फ्लूने गुरुवारी एक वृध्द दगावल्याने खळबळ उडाली. त्यामुळे शुक्रवारी जिल्हा शल्य चिकित्सक अरूण राऊत यांनी वरुड शहर गाठून स्वाईन फ्लूबाबत कार्यशाळा घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.
शुक्रवारी राऊत यांनी वरुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णांची माहिती घेतली. स्वाईन फ्लूने मृत पावलेल्या गुल्हाने नामक वृध्दाच्या नातेवाईकांची भेट घेतली. पश्चात राऊत यांनी नागरिकांना प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली.
स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास तातडीने आवश्यक त्या तपासण्या करून शासकीय रूग्णालयांमधून उपचार सुरू करावेत, असे त्यांनी सांगितले.

Web Title: 'Swine Flu': CS reached Baroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.