स्वाईनफ्ल्यू, डेंग्यूचा फैलाव
By admin | Published: September 1, 2015 11:59 PM2015-09-01T23:59:04+5:302015-09-01T23:59:04+5:30
तालुक्यात चार रुग्णांचा तापाने मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आताही तापाच्या साथीच ेरुग्ण वाढत आहे.
रुग्णांवर नागपुरात उपचार : वरुड तालुक्यातील सरकारीसह खासगी रुग्णालयात गर्दी
संजय खासबागे वरुड
वरुड : तालुक्यात चार रुग्णांचा तापाने मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आताही तापाच्या साथीच ेरुग्ण वाढत आहे. मलेरीया, हिवताप आणि अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. वरुड येथील एक रुग्ण स्वाईनफ्ल्यू च्या आजाराने तर राजूराबाजारचा एक रुग्ण डेंग्यूमुळे नागपूरात उपचार घेत आहे.
वरुड तालुक्यात पुसला, राजूराबाजार, आमनेर,लोणी, शेंदूरजनाघाट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. वरुड येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असून याव्यतिरिक्त खासगी रुग्णालये आहे. गेल्या चार दिवसात तीन लोकांचा तापाने मृत्यू झाला.
ग्रामीण रुग्णालयाच्या बाहयरुग्ण विभागात पाचशेपेक्षा अधिक तर प्राथमिक स्वास्थ केंद्रात सुध्दा शेकडो रुग्ण उपचारासाठी येत आहे. वरुड शहरातील एक रुग्ण नागपूरला स्वाईनफ्ल्यूच्या आजारावर उपचार घेत आहे. राजूराबाजारचा रुग्ण डेंग्य तापाने त्रस्त असल्योन नागपूरातच खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.यामुळे शहरीत आणि ग्रामीण स्वच्छतेचा फज्जा उडाला आहे. शेणखताचे उकीरडे, तुंबलेल्या नाल्या, साचलेले डबके तसेच गांजरगवत , झूडूपे वाढलेली आहे. यामुळेच डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अॅनाफिलीस डासांच्या मादीपासून पसरणारा हा आजार असून या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातून होते. हा डास घरगुती पाणी वापराची भांडी, टाकी, राजण, मोठ, हौद, तसेच परिसरातील डबके, निरुपयोगी वस्तू नेहमी साफसफाई करुन ठेवाव्या. टायर, प्लास्टीकच्या वस्तू ची विल्हेवाट लावावी. डबके, गटारे वाहती करावी, शौचालयाच्या व्हेन्टीलेटर पाईपच्या तोंडाला पिशवी बांधावा. वॉटर कुलर, फुलदाण्या, फवारे, कारंजे यातील दोन तीन दिवसाआड पाणी बदलावे, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील भांडीकुंडी कोरडी करुन ठेवावी. खिडक्या, दरवाज्यांना जाळी बसविण्यात यावी.
ताप आल्यास
आरोग्य केंद्रात जा
तालुक्यात वातावरणीय बदलानुसार ताप, हिवताप तसेच डायरियासारखे आजार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रामीण भागात घाणीचे साम्राज्य कायम आहे. नाल्या तुंबल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यास साथीच्या आजाराचा फैलाव वाढू शकतो. नागरिकांना ताप आल्यास तातडीने आरोग्य केंद्रात संपर्कसाधून उपचार करावे. तसेच डॉक्टरांनी दिलेला औषधीचा पूर्ण डोज घ्यावा. घराशेजारी तणनाशकाची फवारणी करण्यात यावी, साचलेले डबके आणि टाकावू वस्तूचा विल्हेवाट लावल्यास डासांचा प्रादुर्भाव होणार नाही, असे तालुका आरोग्य अधिकारी अमोल देशमुख यांनी सांगितले.
ग्रामीण, शहरी भागात घाणीचे साम्राज्य
ग्रामीण आणि शहरी भागात घाणीचे साम्राज्य कायम असल्याने नागरिकांच्या जिवाशी स्थानिक प्रशासनाचा खेळ सुरू आहे. प्राथमिक उपाययोजना ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेने केल्यास रोगराई पसरणार नसल्याचे नागरिक बोलत आहेत.