सिमेंटीकरणाने चिमण्यांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:13 PM2019-03-19T22:13:21+5:302019-03-19T22:13:45+5:30

शहरीकरणासाठी सिमेंटीकरणाचे वाढते प्रमाण चिमण्यांच्या नैसर्गिक अधिवासास धोका निर्माण करणारे ठरत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी चिमण्यांनाही नैसर्गिक अधिवासासोबतच त्यांना कृत्रिम अधिवासाची आता गरज आहे.

Symanticipation threatens the natural habitat of sparrows | सिमेंटीकरणाने चिमण्यांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका

सिमेंटीकरणाने चिमण्यांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरीकरणासाठी सिमेंटीकरणाचे वाढते प्रमाण चिमण्यांच्या नैसर्गिक अधिवासास धोका निर्माण करणारे ठरत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी चिमण्यांनाही नैसर्गिक अधिवासासोबतच त्यांना कृत्रिम अधिवासाची आता गरज आहे. आसाम येथे लोकसहभागातून चिमण्यांसाठी लाकडी घरट्यांचा अधिवास तयार केला गेला. परिणामी चिमण्यांची संख्या वाढली. आता अमरावतीमध्ये आसाम पॅटर्नप्रमाणे चिमणी संवर्धन करण्याचा मानस पक्षिप्रेमींचा आहे.
भारतात चिमण्यांच्या नऊ प्रजातीचा अधिवास असून, महाराष्ट्रात हाऊसस्पॅरो प्रजातीच्या चिमण्या आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता या चिमण्यांची संख्या रोडावली असून, त्याला वाढते सिमेंटीकरण कारणीभूत आहे.
चिमण्यांना नैसर्गिक अधिवासात राहण्याची सवय असते. मात्र, सिमेटींकरणामुळे चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास कमी झाला आहे. परिणामी चिमण्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. चिमण्यांचा प्रजनन दर चांगला असून, त्या वर्षातून तीनदा अंडी देतात. मात्र, सिमेटींकरण व त्यातच वाढत्या तापमानाचा मोठा फटका या इवल्याशा जिवाला बसत आहे. चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास आक्रसत चालल्यामुळे आता त्यांना कृत्रिम अधिवास निर्माण करण्याची गरज भासू लागली आहे. त्यासाठी लोकसहभाग आणि चिमण्यांबाबत कणव आवश्यक आहे.
प्लास्टिकपेक्षा लाकडाचा वापर करा
गेल्या काही वर्षात अमरावती शहरात चिमण्यांना कृत्रिम अधिवास तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. मात्र, तापमानात वाढ झाल्यास, प्लास्टिकचे साहित्य अधिक तापत असल्यामुळे चिमण्यांच्या जीवनप्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे चिमण्यासाठी लाकडाची घरटे तयार करणेच योग्य आहे. याशिवाय त्यांच्या पिण्याचे पाण्याची सोय करतानासुद्धा प्लास्टिकच्या साहित्यात वापर न करता मातीच्या भांड्याचा उपयोग करणेच योग्य आहे.


सिमेंटीकरणाचा मोठा फटका चिमण्यांना बसला आहे. आसाममध्ये चिमण्यासाठी नैसर्गिक अधिवास तयार केला जात आहे. त्यासाठी लोकसहभागातून लाकडाची घरटी तयार केली जात आहेत. अमरावतीकरांनीही लाकडी घरटे तयार करून चिमणी संवर्धनासाठी पुढाकार घ्यायला हवा.
- यादव तरटे, पक्षी अभ्यासक.

Web Title: Symanticipation threatens the natural habitat of sparrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.