शांतता, सलोख्यासाठी काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:43 AM2018-04-10T00:43:44+5:302018-04-10T00:44:07+5:30
सामाजिक ऐक्य आणि सलोखा जपावा, शांतता कायम राहावी, यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या सूचनेवरून सोमवारी देशभरात राज्य आणि जिल्हास्तरावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. त्यानुसार येथील इर्विन चौकात सकाळी १० पासून शहर, जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे लाक्षणिक उपोषणाला प्रारंभ झाला. यावेळी भाजप सरकारविरोधी नारेबाजी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सामाजिक ऐक्य आणि सलोखा जपावा, शांतता कायम राहावी, यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या सूचनेवरून सोमवारी देशभरात राज्य आणि जिल्हास्तरावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. त्यानुसार येथील इर्विन चौकात सकाळी १० पासून शहर, जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे लाक्षणिक उपोषणाला प्रारंभ झाला. यावेळी भाजप सरकारविरोधी नारेबाजी करण्यात आली.
महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने लाक्षणिक उपोषणास सुरुवात झाली. शहर काँग्रेसतर्फे माजी आमदार रावसाहेब शेखावत, सुलभा खोडके, शहराध्यक्ष किशोर बोरकर, बबलू शेखावत, विलास इंगोले, पुष्पा बोंडे यांनी, तर ग्रामीणतर्फे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे आदींनी उपोषणाचे नेतृत्व केले.
उपोषणस्थळ एकच असताना काँग्रेसने शहर व ग्रामीण असे स्वतंत्र दोन तंबू ठोकल्याची चर्चा जोरात रंगली. परिणामी काँग्रेसमध्ये गटबाजी कायम असल्याचे मानले जात आहे.
आंदोलनात माजी मंत्री यशवंतराव शेरेकर, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, साजिद फुलारी, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, उषा उताणे, सुधाकर भारसाकळे, अनंत साबळे, प्रकाश साबळे, श्रीराम नेहर, शिवाजी बंड, मोहन सिंगवी, गणेश आरेकर, सुरेश निमकर, गजानन राठोड, अभिजित बोके, दिलीप काळबांडे, विनोद गुडदे, प्रकाश काळबांडे, बाळासाहेब हिंगणीकर, हरिभाऊ मोहोड, नितीन दगडकर, दयाराम काळे, सुरेश आडे, किशोर किटूकले, बिटू मंगरोळे, भागवत खांडे, संजय वानखडे, विलास गांजरे, अभिजित देवके, किशोर देशमुख, विठ्ठल सरडे, दिवाकर देशमुख, संजय मापले, श्रीपाल पाल, शिटू सूर्यवंशी, कांचनमाला गावंडे, छाया दंडाळे, बबलू बोबडे, माजी मंत्री सुरेंद्र भुयार, विजय बोंडे, वंदना कंगाले, नीलिमा काळे, मंजुश्री महल्ले, प्रशांत डवरे, शोभा शिंदे, प्रदीप हिवसे, सुनीता भेले, शेख जफर, साहेबराव घोगरे, अनिल माधोगढीया, गणेश पाटील, बी.आर. देशमुख, नानाभाई सोनी, संजय वाघ, पुरुषोत्तम मुंधडा, बाबुसेठ खंडेलवाल, आनंद भामोरे, भैयासाहेब निचळ आदी उपस्थित होते.
शासनाच्या चुकीच्या निर्णयानेच जातीय तणाव : जगताप
केंद्र सरकार चुकीचे निर्णय घेऊन देशात जातीय तणाव निर्माण, दंगली घडवित असल्याचा आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी याप्रसंगी केला. केंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणांमुळे सांप्रदायिक सद्भाव लोप पावत चालला आहे. समाजात तेढ निर्माण होत आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समुदाय असुरक्षित असल्याची भावना जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केली. भाजप सरकारच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता आणि सामाजिक सलोखा संपुष्टात आला आहे. भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांना न्यायालयाने अटकेचे आदेश देऊनही सरकार त्यांना का अटक करीत नाही, असा सवाल शहराध्यक्ष किशोर बोरकर यांनी उपस्थित केला.