ट्रकमालकांचा वरुड तहसीलदारांना घेराव

By admin | Published: December 6, 2015 12:16 AM2015-12-06T00:16:38+5:302015-12-06T00:16:38+5:30

तहसीलदारांनी गौण खनिजाबाबत सुरू केलेल्या धरपकड मोहिमेंतर्गत अनेकांची अडचण झाल्याने गौण खनिज ..

Tackling of truckloads of Varud tehsildars | ट्रकमालकांचा वरुड तहसीलदारांना घेराव

ट्रकमालकांचा वरुड तहसीलदारांना घेराव

Next

गौण खनिजाचा मुद्दा : आमदारही संतापले
वरुड : तहसीलदारांनी गौण खनिजाबाबत सुरू केलेल्या धरपकड मोहिमेंतर्गत अनेकांची अडचण झाल्याने गौण खनिज पोहचविणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक, चालक, मालकांसमवेत आ. अनिल बोंडे यांनी थेट तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना जाब विचारला.
रेतीघाटाच्या लिलावाची रक्कम दीड कोटी एवढी अवाढव्य ठेवल्यामुळे तो लिलाव घेण्यास कुणीही तयार नाही. त्यामुळे रेती अभावी शासकीय व खासगी विकासाची कामे बंद पडली. त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले. त्यातच तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी शासनाच्या नियमावर काटेकोर कारवाई करीत आहे. अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी आ. अनिल बोंडे आपल्या समर्थकांसह तहसील कार्यालयात धडक देऊन तहसीलदार भुसारी यांना जाब विचारला. (शहर प्रतिनिधी)

गौणखनिजाची लिलाव प्रक्रिया अवलंबणे, तालुक्याच्या सीमे- बाहेरून रॉयल्टी भरून आलेला गौन खनिज जमा करून तेथून दुसऱ्या ठिकाणी वितरित करण्यासाठी नि:शुल्क पास देणे हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने त्यांचे मार्गदर्शन व आदेश घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल.
- पुरुषोत्तम भुसारी, तहसीलदार, वरुड.

Web Title: Tackling of truckloads of Varud tehsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.