तडीपार आरोपीस अटक( सारांश)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:28+5:302021-01-14T04:12:28+5:30

------------------------------------------------------- शिराळा येथे तडीपारास अटक अमरावती: वलगाव पोलिसानी शिराळा येथे कारवाई करून शहर हद्दीतून सहा महिन्याकरीता तडीपार करण्यात आलेल्या ...

Tadipar accused arrested (summary) | तडीपार आरोपीस अटक( सारांश)

तडीपार आरोपीस अटक( सारांश)

googlenewsNext

-------------------------------------------------------

शिराळा येथे तडीपारास अटक

अमरावती: वलगाव पोलिसानी शिराळा येथे कारवाई करून शहर हद्दीतून सहा महिन्याकरीता तडीपार करण्यात आलेल्या आरोपी गावात आढळून आल्याने त्याला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

राहुल रामकृष्ण हरडे(३४, रा. शिराळा) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

----------------------------------------------------------------

पुसदा येथे युवकाकडून चाकू जप्त

अमरावती: पुसदा येथे गस्तीवर असताना वलगाव पोलिसानी एका युवकाची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून धारदार चाकू जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

उमेश अण्णाजी वरघट(३५, रा. पुसदा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

-----------------------------------------------------------

फत्तेपूर येथून तडीपारास अटक

अमरावती: नांदगावपेठ पोलिसानी फत्तेपूर येथे कारवाई करून तीन महिन्याकरिता तडीपार असलेला आरोपी कायद्याचे उल्लंघन करून गावात आढळून आल्याने पोलिसानी त्याला अटक केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

नितीन दिलीप खडसे (२१, रा. फत्तेपूर) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

----------------------------------------------------

भानखेडा येथे अवैध दारू जप्त

अमरावती: बडनेरा पोलिसानी भानखेडा येथे कारवाई करून ३६४ रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

जानराव उत्तमराव तलवारे (५१, रा. भानखेडा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी विनापरवाना दारू विक्री करताना आढळून आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

----------------------------------------------------

रेवसा येथे अवैध दारू पकडली

अमरावती: वलगाव पोलिसानी येथील रेवसा येथे कारवाई करून ४६८ रुपयांची अवैध दारू पकडली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

सय्यद वकील सय्यद अब्दुल (४२, रा. बाजारपुरा वलगाव) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पिशवीमध्ये दारू विक्री करताना पोलिसांना मिळून आला. पुढील तपास वलगाव पोलीस करीत आहेत.

---------------------------------------------------------

महिलेस शिवीगाळ

अमरावती: रस्त्याच्या कामावरून वाद घालून एका महिलेस अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध पोलिसानी गुन्हा नोंदविला आहे. ही घटना यशोदानगर येथे मंगळवारी घडली.

सचिन भारूका ( रा. यशोदानगर) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Tadipar accused arrested (summary)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.