दगडाने ठेचून तडीपार गुंडाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:11+5:302021-06-05T04:10:11+5:30

अमरावती : महिनाभरापूर्वीच्या किरकोळ मारहाणीचा वचपा काढण्याच्या उद्देशाने दोघांनी तडीपार गुंडाला दगडाने ठेचले. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्री तलावाजवळ ...

Tadipar gangster brutally killed by being stoned | दगडाने ठेचून तडीपार गुंडाची निर्घृण हत्या

दगडाने ठेचून तडीपार गुंडाची निर्घृण हत्या

Next

अमरावती : महिनाभरापूर्वीच्या किरकोळ मारहाणीचा वचपा काढण्याच्या उद्देशाने दोघांनी तडीपार गुंडाला दगडाने ठेचले. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्री तलावाजवळ शुक्रवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

पोलीससूत्रांनुसार, अशोक उत्तम सरदार (३८, रा. जेवडनगर) असे मृताचे नाव आहे. अतुल तुपाळे (२९) व राजेश थोरात (३३, दोन्ही रा. जेवडनगर) अशी आरोपींची नावे आहेत. मृत अशोक सरदार याने आरोपी अतुल तुपाळेला किरकोळ वादातून मारहाण केली होती. त्यानंतर तो वाद शमला होता. शुक्रवारी अशोक हा मित्रांसोबत छत्रीतलाव परिसरात जेवणाकरिता गेला. आधीच तेथील गार्डनमध्ये असलेल्या अतुल व राजेश यांची त्याच्याशी नजरानजर झाली. त्यानंतर अशोक तेथून पुढे गेला. काही वेळाने अतुल व राजेश हे अशोक जेवण करीत असलेल्या ठिकाणी पोहचले. तेथे त्याच्याशी वाद करून डोक्याला दगड मारून अशोकची हत्या केली.

या घटनेने शहरात खळबळ उडाली. राजापेठ ठाणे हद्दीत खुनाची ही अलीकडच्या काळातील दुसरी घटना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता इर्विन रुग्णालयातील शवागारात पाठविला. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

बॉक्स

आरोपी, मृताची गुन्हेगारी पार्श्वभूमी

मृत अशोक सरदार याच्यावर खून व इतर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. अशोकचा खून करणारे आरोपी अतुल तुपाळे, राजेश थोरात यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२४ व इतर किरकोळ गुन्हे दाखल असल्याचे राजापेठ पोलिसांनी सांगितले.

Web Title: Tadipar gangster brutally killed by being stoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.