ताहेरा बानोच्या हत्याकांडात परिचित संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:46 PM2018-11-19T22:46:58+5:302018-11-19T22:47:49+5:30

हजरतबिलालनगरातील ताहेरा बानो हत्याकांडात परिचित व्यक्ती संशयाच्या भोवºयात असून, पोलिसांनी पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सर्व बाजू तपासल्यानंतरही हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही.

In Tahara Bano's murder case, | ताहेरा बानोच्या हत्याकांडात परिचित संशयाच्या भोवऱ्यात

ताहेरा बानोच्या हत्याकांडात परिचित संशयाच्या भोवऱ्यात

Next
ठळक मुद्देपाच संशयितांची चौकशी : पोलिसांना अद्याप यश नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हजरतबिलालनगरातील ताहेरा बानो हत्याकांडात परिचित व्यक्ती संशयाच्या भोवºयात असून, पोलिसांनी पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सर्व बाजू तपासल्यानंतरही हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही.
ताहेबा बानो यांच्या हत्येविषयी माहिती काढण्यासाठी पोलिसांची विविध पथके तपासकामी लागले असून, त्यांच्या विभिन्न मतामुळे ताहेबा बानो यांची हत्या नेमकी कोणी केली, या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचू शकले नाहीत, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर पोलीस सांगत आहे. ताहेरा बानो यांची गळा आवळून व तोंड दाबून हत्या झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट झाले. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध जबरी चोरी, लूटपाट व हत्येचा गुन्हा नोंदविला.
पोलीस उपायुक्त यशवंत सोळंखे यांच्या नेतृत्वात गाडगेनगर, गुन्हे शाखा व सायबर पोलीस तपासाची सूत्रे हलवित आहे. पोलिसांनी ताहेबा बानो यांचा अमरावतीतील जावई, घरकाम करणाऱ्या नुसरत परवीन, दुधवाला, कंट्रोलमध्ये काम करणारा तरुणासह अन्य दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी चौकशी केली.
सोमवारी सकाळी पुन्हा संशयितांची चौकशी झाली. मात्र, कोणताही उलगडा होऊ शकला नाही. पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असताना पोलिसांकडून अद्याप हत्येचा उलगडा झालेला नाही.
सीसीटीव्ही बंद केले कुणी?
ताहेरा बानो यांच्या घराच्या चौफेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मात्र, शनिवारी रात्री ९ वाजता सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले आहे. रविवारी दुपारी ३ वाजता पोलिसांनी सीसीटीव्ही पुन्हा सुरू केले. ताहेरा बानो व त्यांचे पती अकील अहमद सीसीटीव्ही हे दोघेच घरात असताना सीसीटीव्ही कुणी बंद केला असावा, या निष्कर्षाप्रत पोलिसांचे तपासकार्य पोहचले आहे.
बांधकामस्थळी प्रात्यक्षिक
ताहेबा बानो यांच्या घराशेजारीच एका तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामस्थळी शेकडो मजूर काम करीत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी बांधकाम करणाºया मजुरांची चौकशी केली. हत्येनंतर तेथील एक व्यक्ती मयतीला किंवा तेथे भेटीलासुद्धा आला नव्हता. तो व्यक्ती गायब असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहे. बांधकामस्थळाहून ताहेबा बानो यांच्या घरात शिरण्याचा सोपा मार्ग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे बांधकाम स्थळावरील तो व्यक्ती ताहेरा बानोच्या घरात शिरला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. त्यासाठी पोलिसांनी बांधकाम स्थळावरून ताहेबा बानोंच्या घरात शिरण्यासाठी प्रात्यक्षिक केले.
सीडीआर तपासणी
पोलिसांनी संशयित आरोपींची कसून चौकशी केली. त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून सीडीआरची तपासणीसुद्ध पोलीस करीत आहेत. घटनेवेळी संशयित आरोपी कुठे होते? त्यांनी कोणाशी संपर्क केला, या बारीकसारीक बाबींची चौकशी पोलीस करीत आहेत.

मृताच्या परिचयातील पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सर्व बारीकसारीक बाबी तपासून पाहिल्या जात आहे. लवकरच हत्येचा उलगडा होईल.
- यशवंत सोळंखे,
पोलीस उपायुक्त

Web Title: In Tahara Bano's murder case,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.