तहसील कार्यालय भातकुलीतच जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:43 PM2019-01-08T22:43:04+5:302019-01-08T22:43:27+5:30

शहरातील भातकुली तहसीलचे कार्यालय भातकुली गावात स्थांनातरित होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थानांतरणास विरोध करणारी याचिका रद्द ठरविली असून, राज्य शासनाने १५ दिवसांच्या आत ‘नोटिफिकेशन’ काढून तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरित करण्याचे आदेश ८ जानेवारी रोजी दिले. नागपूर खंडपीठातील आर.के. देशपांडे व विनय जोशी यांच्या द्विसदस्यीय न्यायासनासमोर मंगळवारी या याचिकेवर अंतिम सुनावणी झाली.

Tahsil office will be located in Bhatkulite | तहसील कार्यालय भातकुलीतच जाणार

तहसील कार्यालय भातकुलीतच जाणार

Next
ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा निर्वाळा : रवी राणा यांच्या लढ्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील भातकुली तहसीलचे कार्यालय भातकुली गावात स्थांनातरित होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थानांतरणास विरोध करणारी याचिका रद्द ठरविली असून, राज्य शासनाने १५ दिवसांच्या आत ‘नोटिफिकेशन’ काढून तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरित करण्याचे आदेश ८ जानेवारी रोजी दिले. नागपूर खंडपीठातील आर.के. देशपांडे व विनय जोशी यांच्या द्विसदस्यीय न्यायासनासमोर मंगळवारी या याचिकेवर अंतिम सुनावणी झाली.
अमरावती शहरातील भातकुली तहसील कार्यालय हे भातकुलीत स्थानांतरित करण्यात यावे, या मागणीसाठी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांनी शासनस्तरावर जोरदार पाठपुरावा केला होता. शासनाशी लढून त्यांनी तहसील स्थानांतरणाचा आदेश मिळवून घेतला होता. मंगळवारचा न्यायालयीन आदेश त्यांच्या प्रयत्नांची फ लश्रुती होय.
महसूल व वनविभागाचे अवर सचिव नि.पा. आव्हाड यांच्या निर्देशानुसार अमरावतीच्या तत्कालीन विभागीय आयुक्तांनी जून २०१७ मध्ये अमरावती कॅम्पमधील भातकुली तहसील कार्यालय हे भातकुली येथिल प्रशासकीय इमारतीत स्थानांंतरित करण्याची प्रक्रिया आरंभली. तथापि १९ जून २०१७ रोजी काँग्रेस , भाजप, सेना व अन्य राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला. आ. रवि राणा यांनी तो विरोध पूर्वग्रहदूषित असल्याचे सांगितले. त्याचवेळी विभागीय आयुक्तांच्या तहसील स्थानांतरणाच्या आदेशाविरोधात भातकुली तालुक्यातील प्रवीण भुगूल व अन्य सात जणांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.
आमदार रवी राणा आग्रही
भातकुलीचा आता सर्वांगीण विकास होत आहे. मात्र, या गावात तहसीलचे मुख्यालय नसल्याने गावातील तसेच आसपासच्या ११० गावांतील नागरिकांना अमरावतीस हेलपाटे घालावे लागतात. यात त्यांना प्रचंड मनस्ताप होतो. म्हणून हे कार्यालय भातकुलीत स्थानांतरित करावे, अशी मागणी आ. रवि राणा यांनी शासनाकडे रेटून धरली. त्यांच्या पाठपुराव्याने याप्रकरणी राज्य शासनाच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

अमरावती शहरातील भातकुली तहसील कार्यालय हे भातकुली येथे स्थानांतरित करण्याबाबत १५ दिवसांत अंतिम आदेश काढण्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. या आदेशाने भातकुली शहरात तहसील कार्यालय स्थानांतरित होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
- जेमिनी कासट
याचिकाकर्ते गिरीश कासट यांचे वकील

तहसील कार्यालयाच्या स्थानांतरणाचा संकल्प केला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे भक्कम पाठपुरावा केला. राज्य शासनातर्फे बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांची नियुक्ती करवून घेतली. न्यायालयाने स्थानांतरणाचा आदेश दिल्याने तालुक्यातील नागरिकांचा, सत्याचा विजय झाला आहे. ४० वर्षांनंतर तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
- रवि राणा, आमदार, बडनेरा मतदारसंघ

Web Title: Tahsil office will be located in Bhatkulite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.