१५ कोचिंग क्लासेसवर कारवाईचा बडगा

By admin | Published: June 24, 2017 12:13 AM2017-06-24T00:13:22+5:302017-06-24T00:13:22+5:30

अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला जाहिरात लावणाऱ्या १५ कोचिंग क्लासेसवर बुधवारी फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला.

Take action against 15 coaching classes | १५ कोचिंग क्लासेसवर कारवाईचा बडगा

१५ कोचिंग क्लासेसवर कारवाईचा बडगा

Next

अनधिकृत जाहिराती : बाजार परवानाची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला जाहिरात लावणाऱ्या १५ कोचिंग क्लासेसवर बुधवारी फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला. यासंदर्भात महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
विनापरवानगी शहरातील विविध मार्गावर जाहिरात फलके लावल्याची बाजार व परवाना विभागाच्या निदर्शनास आले. यामध्ये सर्वाधिक कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींचा समावेश आहे. अनधिकृतपणे फलके लावणाऱ्यांमध्ये गाडगेनगरातील शासकीय तंत्रनिकेतन येथील ओम फिनिक्स, अप्पू कॉलनीतील प्री-स्कूल अ‍ॅबॅकस, राठी नगरातील श्रीखंडे, बोडखे, वैष्णवी कोचिंग, ग्रामर अ‍ॅकेडमीचे आशिष सी.एम.भाकरे, गुरू ट्ययुटोरीयलचे प्रो.त्रीशुल, राधा नगरातील फिनिक्स अ‍ॅकेडमीचे धनंजय पाडोळे, राजगुरू, श्री कोचिंगचे सागर, राठी नगरातील व्हिजन कॉम्प्युटरचे लक्ष आयटी सोल्युशन, परफेक्ट ट्युटोरीयल, गाडगेनगरातील भांडे याचा समावेश आहे. बाजार व परवाना विभागाचे अधिकारी रामदास वाकपांजर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांवरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Take action against 15 coaching classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.