डेंग्यूने मूत्यूप्रकरणी दोषीवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 09:53 PM2018-10-14T21:53:16+5:302018-10-14T21:53:42+5:30

शहरासह जिल्ह्यात डेंग्यूने सात नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला. यासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून या प्रकरणाची गृहविभागाकडून चौकशी व कारवाई करावी, तसेच मृतांच्या कुटुंबाला भेट देऊन शासनाच्यावतीने आर्थिक मदतीची मागणी आमदार रवि राणा, युवा स्वाभिमानच्या मार्गदर्शिका नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

Take action against the accused in dengue mutu case | डेंग्यूने मूत्यूप्रकरणी दोषीवर कारवाई करा

डेंग्यूने मूत्यूप्रकरणी दोषीवर कारवाई करा

Next
ठळक मुद्देनवनीत राणा : मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरासह जिल्ह्यात डेंग्यूने सात नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला. यासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून या प्रकरणाची गृहविभागाकडून चौकशी व कारवाई करावी, तसेच मृतांच्या कुटुंबाला भेट देऊन शासनाच्यावतीने आर्थिक मदतीची मागणी आमदार रवि राणा, युवा स्वाभिमानच्या मार्गदर्शिका नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
जिल्ह्यात दोन महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे. आतापर्यंत सात जणांचा बळी गेला. अद्यापही सहाशेचेवर रुग्ण डेंग्यू आजारावर उपचार घेत असल्याची नोंद आहे. याप्रकरणी मृतांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन शासनाच्यावतीने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाच्या मार्गदर्शक नवनीत राणा यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे खरीप पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. यासाठी एकरी ३० हजारांचा मदतनिधी तत्काळ उपलब्ध करावा, यासह अन्य मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्यात. याशिवाय अचलपूर जिल्ह्याची निर्मिती करावी, अमरावती जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट प्रति एकरी ३० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अमरावती तहसीलचे विभाजन करून बडनेरा व वलगाव येथे तहसीलची स्वतंत्र इमारत मंजूर करावी, जिल्हातील सिंचन प्रकल्पात शेती गेलेल्या शेतकऱ्यांना सध्याच्या बाजारभावाप्रमाणे शासनाने आर्थिक सहाय्य मंजूर करावे.
योग्य कारवाईचे आश्वासन
मेळघाट मधील तापी प्रकल्पात एकही गाव जाऊू देणार नाही, अमरावतीत शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करावे आदी मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे युवा स्वाभिमानच्या मार्गदर्शक नवनीत राणा यांनी लक्ष वेधले. यावर लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू रोडगे, संजय हिंगारपुरे, मयुरी कावरे, सुमती ढोके, रश्मी घुले, मीनल डकरे, प्रदीप थोरात, सपना ठाकूर, आशिष गावंडे, अभिजित देशमुख, अनूप अग्रवाल, विनोद गुहे, महानंदा पवार, गिरीश कासट, प्रवीण पवार, लता रायबोले, रेखा पवार उपस्थित होते.

 

Web Title: Take action against the accused in dengue mutu case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.