रासायनिक खतांची साठेबाजी, बोगस बियाणे देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:10 AM2021-06-06T04:10:16+5:302021-06-06T04:10:16+5:30
प्रहारची जिल्हा कचेरीवर धडक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अमरावती : खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी वर्ग पेरणीच्या तयारी लागला असतानाच रासायनिक ...
प्रहारची जिल्हा कचेरीवर धडक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती : खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी वर्ग पेरणीच्या तयारी लागला असतानाच रासायनिक खताची साठेबाजी व बोगस बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे अशा दुकानदारांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सादर निवेदनातून केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे दोन वर्षांपासून शेतकरी वर्ग आधीच संकटात आहे. अशात आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. खरीप पेरणीच्या तयारीसाठी शेतकरी व्याजाने पैसे काढून शेतीची मशागत करत आहे. त्यातच पेरणीसाठी लागणारे रासायनिक खते, बी - बियाणे यात मोठ्या प्रमाणात कृषी केंद्रांत साठेबाजी केली जाते आणि ब्लॅकमध्ये खताची विक्री केली जाते. मात्र, यात सामान्य शेतकऱ्याला जास्त पैसे मोजावे लागत आहे. एवढेच नव्हे तर बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे गतवर्षी बी - बियाणे बोगस निघाले. त्यावर त्वरित बंदी घालण्यात यावी व प्रत्येक कृषी केंद्रात दरफलक लावण्यात यावे, फलक न लावल्यास दंड आकारण्यात यावा, तसेच यावर्षी अमरावती, नांदगाव तालुक्यात युरिया साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावा, युरियाची साठेबाजी होणार नाही, याची काळजी घावी आदी मागण्या प्रहारने जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. यासंदर्भात तातडीने पावले उचलावित. अन्यथा प्रहार संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार संघटनेचे रोशन देशमुख, विनायक मंचलवार, मुकेश गुडिया, राहुल पाटील, अमोल कावलकर, धीरज सोनी, मनोज शर्मा आदीं दिला.