शासकीय धान्य खरेदी बंद ठेवणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:06 PM2018-03-14T23:06:27+5:302018-03-14T23:06:27+5:30
नांदगाव खंडेश्वर येथील नाफेडची धान्य खरेदी बंद ठेवणाऱ्यांवर कारवाई करावी आणि तातडीने धान्य खरेदी सुरू करावी, ...
आॅनलाईन लोकमत
अमरावती : नांदगाव खंडेश्वर येथील नाफेडची धान्य खरेदी बंद ठेवणाऱ्यांवर कारवाई करावी आणि तातडीने धान्य खरेदी सुरू करावी, अशी मागणी बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, नगरपंचायत अध्यक्ष अक्षय पारसकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
शेतमाल खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. १५ मार्चपर्यंत खरेदी सुरू न केल्यास १६ मार्चपासून रास्ता रोको करण्याचा इशारा तालुका काँग्रेस कमिटीने दिला. त्यामुळे नाफेड खरेदी केली जात असलेली तूर व हरभरा खरेदी पूर्ववत सुरू करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी बबलू देशमुख, बाळासाहेब इंगळे, अक्षय पारस्कर, बळवंत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, नितीन दगडकर, प्रवीण घुईखेडकर, विठ्ठल चव्हाण, विनोद चौधरी, दीपक सवाई, सुनील शिरभाते, दिपक पाटेकर, बंडू पाटेकर, सरफराज पठाण, अशोक खंडारे, प्रवीण सवाई, मनीष सावदे, अरुण इंगोले, नीता सावदे, गजेंद्र आडे, संजय कुंभलकर, नरेश ठाकरे आदींनी केली आहे.