सीईओंवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:26 AM2019-05-30T01:26:47+5:302019-05-30T01:27:07+5:30
जिल्हा परिषद सदस्यांना अपमानास्पद वागणूक देणाºया सीईओ मनीषा खत्री यांच्यावर कारवाई करण्यात यावी व जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भूयार यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे परत घेण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी निवेदनातून करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद सदस्यांना अपमानास्पद वागणूक देणाºया सीईओ मनीषा खत्री यांच्यावर कारवाई करण्यात यावी व जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भूयार यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे परत घेण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी निवेदनातून करण्यात आली.
जिल्हा परिषदेत मंगळवारी पाणीटंचाई निवारण सभेतील प्रकाराबाबत मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांनी पोलिसांकडे तक्रार करून देवेंद्र भुयार यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे नोंदविण्यात सांगितले व त्यांना अटक करायला लावली. ही बाब अधिकाºयांद्वारे लोकप्रतिनिधींची मुस्कटदाबीचाच प्रकार आहे. जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई आहे. बेनोडा सर्कलमधील पाणीटंचार्ईच्या मुद्द्यावर बीडीओ उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे भुयार आक्रमक झाले. प्रशासन व पदाधिकारी यांच्यातील हा वाद आहे. या सर्व प्रकाराबाबत संघटनाद्वारे निषेध करण्यात आला. या प्रकाराला जबाबदार असलेल्या सीईओ व बीडीओ यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच इशारा देण्यात आला. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, राज्य प्रवक्ता रवि पडोळे, प्रवीण मोहोड, अंकुश कडू, आनंद आमले, संजय जाधव, नंदकिशोर शेरे, अतुल ढोके, चंद्रशेखर देशमुख आदी उपस्थित होते.