‘आरएफओं’विरूद्धचे गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:36 PM2017-09-18T22:36:43+5:302017-09-18T22:36:58+5:30
वाघांच्या अवयवांसह अटक केलेला आरोपी वनकोठडीतून पळून गेल्यानंतर त्याचा मृतदेह आढळल्याप्रकरणी दोन वन परिक्षेत्राधिकाºयांवर (आरएफओ) पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाघांच्या अवयवांसह अटक केलेला आरोपी वनकोठडीतून पळून गेल्यानंतर त्याचा मृतदेह आढळल्याप्रकरणी दोन वन परिक्षेत्राधिकाºयांवर (आरएफओ) पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे अन्यायकारक असून ते तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी शुक्रवारी ‘फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन’ने राज्याच्या प्रधान वनसचिवांकडे केली आहे.
अमरावती येथे आजपासून दोन दिवसीय वनपरिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेसाठी प्रधान वनसचिव विकास खारगे आले असताना त्यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी ‘फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन’चे अध्यक्ष के.व्ही. बोलके यांनी प्रधान वन सचिवांकडे एकूण घटनाक्रम विशद केला. पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत देवीदास तुकाराम कुंभरे व बाबूलाल मन्साराम कुंभरे यांना २६ जून २०१७ रोजी वन्यप्राणी, व्याघ्रांच्या अवयवासह वनाधिकाºयांनी अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. एकूण १७ आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत तीन वाघांचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणातील आरोपी देवीदास कुंभरे यास पहिल्यांदा अटक करताना तो पळाला आणि खड्ड्यात पडून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याने पोलीस ठाणे देवलापूर येथे ११ सप्टेंबर २०१७ रोजी वनधिकाºयांविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली. व्याघ्र अवयव तपासात जि.प.सदस्य शांताबाई कुंभरे यांनी हस्तक्षेप केला आहे. १८ आॅगस्ट २०१७ रोजी धवलापूर येथील आरोपी महादेव उईके कस्टडीतनू पळाला व २६ आॅगस्ट रोजी त्याचेच गावाजवळ मृतदेह आढळला. याप्रकरणी पवनीचे आरएफओ पी.एस.पाखले, नागलवाडीचे एन.आर.गावंडे यांचेविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे व्याघ्र शिकारप्रकरणी वनक्षेत्राधिकाºयांवर राजकीय दबाब आणला जात असल्याची कैफियत आरएफओंनी मांडली. यावेळी के.व्ही. बोलके, ए.आर.देवकर, जी.बी.लांबाडे, प्रशांत भुजाडे, कैलास भुंबर आदी आरएफओ उपस्थित होते.