तायडे यांच्यावरील अ‍ॅट्रॉसिटी मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:29 PM2018-10-11T21:29:57+5:302018-10-11T21:30:10+5:30

जिल्हा परिषदेतील भाजप गटनेता प्रवीण तायडे यांच्यावर गाडगेनगर ठाण्यात दाखल झालेला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याविषयीचे निवेदन पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांना गुरुवारी देण्यात आले.

Take back the stratus on Tayade | तायडे यांच्यावरील अ‍ॅट्रॉसिटी मागे घ्या

तायडे यांच्यावरील अ‍ॅट्रॉसिटी मागे घ्या

googlenewsNext
ठळक मुद्देभाजयुमोची मागणी : सीपींना निवेदन, राजकीय षड्यंत्राचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेतील भाजप गटनेता प्रवीण तायडे यांच्यावर गाडगेनगर ठाण्यात दाखल झालेला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याविषयीचे निवेदन पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांना गुरुवारी देण्यात आले. तायडे यांना गोवण्याचे हे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.
जिल्हा परिषदेत शनिवारी झालेल्या आमसभेत तायडे यांनी मेळघाटातील एकूण शिक्षण पद्धतीवर आरोप करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात असल्याचा आरोप केला होता. हा विषय पटलावर घेण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी काँग्रेसच्या सदस्यांनी विनाकारण हंगामा करीत प्रकरणाला गंभीर वळण दिले. जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार उघड केल्यानेच विरोधी सदस्यांनी राजकीय षड्यंत्रातून गाडगेनगर ठाण्यात अ‍ॅट्रासिटीची खोटी तक्रार दिली व ठाणेदारांनीदेखील प्रकरणाची शहानिशा न करता गुन्हे दाखल केले. हे सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, युवा मोर्चाचे प्रसाद भुगूल, आशिष राठोड, ऋषीकेश चांगोले, धम्मराज नवले, जयकृष्ण तायडे, अरविंद तायडे, मनोज काळे, शशिकांत तायडे, अजय तायडे, विनायक गांवडे, श्रेयस माकोडे, राजू तायडे, मंगेश काळे, स्वप्निल गाडवे, रवि धामणकर, संजय तायडे, अनिकेत तायडे, योगेश खांडेकर, संदीप तायडे, प्रज्वल तायडे, अजय तायडे, अनिकेत तायडे, योगेश खांडेकर, कुलदीप तायडे, रोहित काळे, निशिकांत तायडे, मनोहर तायडे, अमोल तायडे, अभिजित तायडे, अभिजित भडांगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Take back the stratus on Tayade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.