येथे सांभाळा दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:14 AM2021-09-23T04:14:53+5:302021-09-23T04:14:53+5:30

मालविय चौक ते पुढे राजापेठपर्यंतच्या उड्डाणपुलाखाली दुचाकी पार्क केल्या जातात. त्या दुचाकी चोरांकडून लक्ष्य केल्या जातात. शहरात खरेदीसाठी बाहेर ...

Take care of the bike here | येथे सांभाळा दुचाकी

येथे सांभाळा दुचाकी

Next

मालविय चौक ते पुढे राजापेठपर्यंतच्या उड्डाणपुलाखाली दुचाकी पार्क केल्या जातात. त्या दुचाकी चोरांकडून लक्ष्य केल्या जातात. शहरात खरेदीसाठी बाहेर पडणारे शेकडो चालक दुचाकी या उड्डाणपुलाखाली ठेवतात. या भागातून सर्वाधिक दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी आहेत.

/////////////

श्याम चौक

अलीकडे श्याम चौकातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. तेथील एका बँकेच्या पार्किंगमधूनदेखील दुचाकी चोरीला गेल्या आहेत. महापलिकेच्या मार्केट परिसरातूनसुद्धा चोरांनी दुचाकीवर डल्ला मारला आहे.

/////////////

ऑटो गल्ली, नमुना

ऑटोगल्लीत अनेक संकुलासह मोबाईल दुकाने आहेत. राजकमल चौकातील मुख्य मार्केटला पार्किंगची सोय नसल्याने अनेकजण आपली दुचाकी वाहने ऑटोेगल्लीत लावतात. तेथूनदेखील दुचाकी चोरीला जाण्याची नोंद आहे. नमुना, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, शेगाव नाका, बडनेरा, व्हीएमव्ही परिसर, खापर्डे बगिचा येथूनही दुचाकी चोरीला गेल्या.

//////////////////

दुचाकी सापडण्याचे प्रमाण कमी

सन २०२० मध्ये अमरावती शहर आयुक्तालय क्षेत्रातून ३३६ विविध प्रकारची वाहने चोरीला गेल्याची नोंद एनसीआरबीच्या अहवालात आहे. त्या तुलनेत दुचाकी सापडण्याचे प्रमाण अल्प आहे.

२) ग्रामीणमधील परिस्थिती देखील सारखीच आहे. अनेक चोर ग्रामीण भागातील रस्ते, शिवार, बसस्थानक परिसरातील वाहने लक्ष्य करतात. उशिराने गुन्हे दाखल केले जातात.

//////////////

सीसीटीव्ही कॅमेरे हवेत

शहरात चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेेर्यांची गरज आहे. मात्र, आमचा तो प्रस्ताव अद्यापही महापालिकेकडे धूळखात पडला आहे. वाहनचालकांनी आपली वाहने पार्किंगमध्येच लावावीत. वाहने एकाच ठिकाणी अधिक वेळ लावू नयेत. वाहनचोरीबाबत तातडीने तक्रार नोंदवावी.

- विक्रम साळी,

उपायुक्त, शहर आयुक्तालय

/////////////

चोरलेल्या दुचाकीचा वापर

चोरी अथवा घरफोडी करताना चोरट्यांना जास्त वेळ लागतो, मात्र मंगळसूत्र चोरी करणे अवघ्या काही क्षणाचे काम आहे. यामध्ये पकडले जाण्याचा धोकाही कमी असतो; तसेच चोरी, घरफोडीत काय ऐवज हाती लागेल हे निश्चित चोरट्यांना माहिती नसते. मात्र, मंगळसूत्र चोरीत ऐवज त्यांच्यासमोर असतो. त्यामुळे इतर गुन्हेगारही मंगळसूत्र चोरीकडे वळल्याचे दिसून येत आहे. त्यात चोरीच्या दुचाकीचा वापर होत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे.

Web Title: Take care of the bike here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.