ज्येष्ठांना सांभाळा, ९८.४० टक्के मृत्यू ५० वर्षांवरील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:58+5:302021-05-27T04:12:58+5:30

गजानन मोहोड अमरावती : कोरोना संक्रमनामुळे २४ मेपर्यंत १,३८२ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ९८.४० टक्के म्हणजेच १,०६० मृत्यू ५० ...

Take care of seniors, 98.40% of deaths are over 50 years | ज्येष्ठांना सांभाळा, ९८.४० टक्के मृत्यू ५० वर्षांवरील

ज्येष्ठांना सांभाळा, ९८.४० टक्के मृत्यू ५० वर्षांवरील

Next

गजानन मोहोड

अमरावती : कोरोना संक्रमनामुळे २४ मेपर्यंत १,३८२ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ९८.४० टक्के म्हणजेच १,०६० मृत्यू ५० वर्षावरील रुग्णांचे आहेत. त्यामुळे संक्रमनकाळात ज्येष्ठांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मृतांमध्ये सर्वाधिक ९४७ म्हणजेच ६८.५२ टक्के प्रमाण पुरुष रुग्णांचे आहे. याशिवाय ४३५ महिलांचा देखील कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे.

महापालिका क्षेत्रातील हाथीपूरा भागात ४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर मृतांची संख्या वाढतीच आहे. एप्रिल २०२० या महिन्यात १० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता तर आता एप्रिल २०२१ मध्ये ४१० संक्रमितांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान २४ मेपर्यत १,३८० रुग्णांचे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या माहितीनूसार एप्रिल २०२० मध्ये १० मृत्यू, मेमध्ये ५, जून ९, जुलै ४०, ऑगस्ट ७४ सप्टेंबर, सप्टेंबर १५४, ऑक्टोबर ७२, नोव्हेंबर १४, डिसेंबर १८, जानेवारी २०२१ मध्ये २२, फेब्रुवारीत ९२, मार्च १६४, एप्रिल ४१० व मे महिण्यात आतापर्यंतचे सर्वात जास्त म्हणजे ४२४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

कोरोनाच चाचणी उशिरा करणे, अंगावर दुखणे काढणे व जास्त झाल्यावरच नागरिक दवाखान्यात जात असल्याने मृत्यू प्रमाण वाढत आहे. याशिवाय कोरोना संसर्गासह कोमार्बिडीटीमध्ये मधुमेह, रक्तदाब यासारख्या आजारामध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी होत असल्यानेही संसर्ग झाल्यानंतर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू ओढावत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

बॉक्स

दाखल केल्याचे २४ तासांत २३७ मृत्यू

कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात दाखल केल्याचे २४ तासांत २३७ रुग्णांचा मृत्यू झालेला झालेला आहे. यामध्ये मे महिन्याच्या २४ दिवसांत १११ रुग्णांचा समावेश आहे. ४८ तासांत २८४ रुग्णांचा मृत्यू झाला, ७२ तासांत २०१ रुग्णांचा मृत्यू, ९६ तासांत १४६ रुग्णांचा मृत्यू, १२० तासांत १४४, तर १२० व त्यापुढील तासांमध्ये ३७० कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

बॉक्स

महापालिका क्षेत्रापेक्षा ग्रामीणमध्ये मृत्यू जास्त

जिल्ह्यात सोमवारपर्यत १,३७० कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झालेले आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रात ५९४ तर ग्रामीणमध्ये ७७६ मृत्यू झालेले आहे. यामध्ये नऊ मृत्यू ‘होमडेथ’ आहेत. याशिवाय जिल्ह्यातील ३५ कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झालेले आहेत. यात सर्वात जास्त ९३० रुग्णांचे मृत्यू आरआरएसएच हॉस्पिटलमध्ये व अन्य एका खासगी रुग्नालयात ९५ मृत्यू झालेले आहेत.

बॉक्स

ग्रामीणमध्ये संसर्गाचे चार क्लस्टर

जिल्ह्यात सद्यस्थितीत ग्रामीणमध्ये संक्रमन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये मोर्शी तालुक्यात चिंचोली गवळी, अचलपूर तालुक्यात कविठा, चिखलदरा तालुक्यात चिंचखेडा व धामणगाव रेल्वे तालुक्यात वाघोलीचा समावेश आाहे. याशिवाय ७७१ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सध्या अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. याशिवाय २४६ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.

पाईंटर

संक्रमित महिला पुरुषांचे वयोगटनिहाय मृत्यू

० ते १० वयोगट : १ बालक, १ बालिका

११ ते २० वयोगट : २ पुरुष, २ महिला

२१ ते ३० वयोगट : १५ पुरुष, ९ महिला

३१ ते ४० वयोगट : ७५ पुरुष, २६ महिला

४१ ते ५० वयोगट : १२६ पुरुष, ६५ महिला

५१ ते ६० वयोगट : २१५ पुरुष, १२४ महिला

६१ ते ७० वयोगट : २५९ पुरुष, १२५ महिला

७१ ते ८० वयोगट : १८४ पुरुष, ६४ महिला

८१ ते ९० वयोगट : ६३ पुरुष, १८ महिला

९१ ते १०० वरील : ७ पुरुष, १ महिला

Web Title: Take care of seniors, 98.40% of deaths are over 50 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.