लहान मुलांची घ्या काळजी, ओपीडीमध्ये दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:17+5:302021-08-22T04:16:17+5:30

बॉक्स २८ टक्के मुलांची कोरोना चाचणी सर्दी, खोकला, ताप या आजाराच्या मुला-मुलींना कोरोनाची लक्षणे समजून दररोज जिल्हा सामान्य रुग्णालय, ...

Take care of young children, double the OPD | लहान मुलांची घ्या काळजी, ओपीडीमध्ये दुपटीने वाढ

लहान मुलांची घ्या काळजी, ओपीडीमध्ये दुपटीने वाढ

Next

बॉक्स

२८ टक्के मुलांची कोरोना चाचणी

सर्दी, खोकला, ताप या आजाराच्या मुला-मुलींना कोरोनाची लक्षणे समजून दररोज जिल्हा सामान्य रुग्णालय, पीडीएमसीसह विविध ठिकाणी २० ते ३० बालकांची कोरोना चाचणी केली जात आहे.

बालकांचा ताप उतरत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून कोरोना चाचणी केली जात आहे. मात्र, त्यात पॉझिटिव्ह येत नसल्याचे चित्र आहे.

---

डेंग्यू मलेरियाची चाचणी

डेंग्यू व चिकनगुनियाचे रक्तजल नमुने ४३७ घेण्यात आले त्यात अनुक्रमे ७९, ४ पॉझिटिव्ह आले. मलेरियाचे १.९३ लाख रक्तनमुने घेण्यात आले, यात ९ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी दिली. आणि कोविड पॉझिटिव्ह निघाले नसल्याने जिल्ह्यात तिसऱ्या लाटेचा धोका जाणवत नाही.

--

ही घ्या दक्षता

१ मुलांना पावसात बाहेर नेऊ नका. त्यांची विशेष खबरदारी घ्या.

२ घरातील कूलरमधील पाणी रिकामे करा, आजूबाजूला डबके साचले असेल तर ते साफ करा.

३मुलांना मास्क लावा, सॅनिटायझर आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

--

बालरोगतज्ज्ञ काय म्हणतात?

रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. यामध्ये डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण अधिक आहे. एमआयएससी हा आजार काहींमध्ये पहायला मिळाला. लहान मुले आजारी पडल्यानंतर तत्काळ उपचार केल्यास पुढील त्रास पालकांना टाळता येतो.

- डॉ. अमोल फाले, एसएनसीयू विभाग, डफरीन

वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये विविध आजाराच्या रुग्णांचा समावेश आहे. या परिस्थितीत उपचारानंतर बालके बरी झाली आहेत. काळजी घेणे आवश्यक आहे.

- अद्वैत पानट, बालरोगतज्ज्ञ

Web Title: Take care of young children, double the OPD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.