पोलीसदादा स्व:ताच्या आरोग्याचीही काळजी घ्या (बातमीचा जोड)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:12 AM2021-05-15T04:12:32+5:302021-05-15T04:12:32+5:30
वडिलांना स्पाँडिलायटिसचा आजार आहे. त्यांना दुचाकी चालविताना त्रास होतो. ग्रामीणमध्ये कार्यरत असल्याने त्यांची आठ दिवसांतून एकदा भेट होते. शिक्षकांच्या ...
वडिलांना स्पाँडिलायटिसचा आजार आहे. त्यांना दुचाकी चालविताना त्रास होतो. ग्रामीणमध्ये कार्यरत असल्याने त्यांची आठ दिवसांतून एकदा भेट होते. शिक्षकांच्या तुलनेत पोलिसांना पगार कमी व कामाचा ताण आहे. त्यात शासनाने दोन दिवसाचा पगार कपातीचा निर्णय घेतला, हे चुकीचे आहे. कोरोनाकाळात जीव धोक्यात टाकून ड्युटी करावी लागते. त्यामुळे भीती वाटते.
अवंती गजानन कडू
कठोरा नाका
कोट
वडील ठाणेदार असल्याने त्यांच्या कामाचा व्याप मोठा आहे. एक वर्षापासून सतत रात्रंदिवस ड्युटी करावी लागते. कोरोनाकाळात ताण वाढला आहे. पोलीस प्रशासनाने ड्युटीचा कालावधी कमी करून मनुष्यबळ वाढवायला हवे. सततच्या लॉकडाऊनमुळे वडिलांना घरचे जेवणही मिळत नाही. कुटुंबाकरिता त्यांना वेळ देता येत नाही.
सचिन पुंडलिक मेश्राम, छत्रसालनगर अमरावती
कोट
वडिलांना कोरोना झाला होता. तेव्हाच कोरोनाचे गांभीर्य कळले. तो काळ परिवारासाठी कठीण होता. आजारावर मात करून ते कोरोनायोद्धा ठरले. आताही फार काळजी वाटते. लोकांशी सतत संपर्क येत असल्याने ते पुन्हा संक्रमित होणार नाही ना, याची काळजी वाटते. लसीकरण होताच त्यांना तातडीने बंदोबस्ताला जावे लागले.
राजश्री राहुल आठवले, मेहेरबाबा कॉलनी, अमरावती