हनुमानाच्या मूर्तीचा मुकुट लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2016 12:20 AM2016-03-03T00:20:33+5:302016-03-03T00:20:33+5:30
स्थानिक माता चौक परिसरातील हनुमान आणि दुर्गादेवीच्या मंदिरातून सोमवारी चोरटयांनी चांदीचा मुकुट आणि डोक्यावरचे छत्र चोरुन नेले.
दुर्गेच्या शिरावरील छत्रही लांबविले : शेंदुरजनाघाट येथील घटना
शेंदूरजनाघाट : स्थानिक माता चौक परिसरातील हनुमान आणि दुर्गादेवीच्या मंदिरातून सोमवारी चोरटयांनी चांदीचा मुकुट आणि डोक्यावरचे छत्र चोरुन नेले.
चोरी गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १३ हजार ५०० रूपये असल्याचा अंदाज आहे. विस्तृत माहितीनुसार येथील माता चौक परिसरात हनुमान मंदिर असून येथील मूर्तीला चांदीचा मुकुट चढविला होता. तो चोरट्यांनी लंपास केला. शेजारीच असललेल्या दुर्गा देवीच्या मंदिरातही चोेरट्यांनी चोरी केली आणि देवीच्या डोक्यावरील चांदीचे छत्र चोरून नेले.
याप्रकरणी शेंदुरजना घाट पोलिसांनी सुभाष पालिवाल यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार अशोक लांडे करीत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. (वार्ताहर)