साथीच्या आजारांवर उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:14 AM2021-09-23T04:14:38+5:302021-09-23T04:14:38+5:30

मोर्शी : तालुक्यातील ग्रामीण भागात डेंग्यूसदृश आजारासह टायफाईड, मलेरिया व इतरही साथीचे आजार वाढत असून, यावर त्वरित उपाययोजना करण्यात ...

Take measures against epidemics | साथीच्या आजारांवर उपाययोजना करा

साथीच्या आजारांवर उपाययोजना करा

Next

मोर्शी : तालुक्यातील ग्रामीण भागात डेंग्यूसदृश आजारासह टायफाईड, मलेरिया व इतरही साथीचे आजार वाढत असून, यावर त्वरित उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी छत्रपती शिवाजी मैत्री संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने करण्यात आली. याबाबत लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत मोर्शी शहरासह ग्रामीण भागातील डेंग्यूच्या आजाराने पाच शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तरीसुद्धा प्रशासनामार्फत या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नसल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवाजी मैत्री संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आता तरी ग्रामीण भागात दिवसाआड फवारणी करून व सात दिवसातून नाली सफाई करण्यात यावी, गाजरगवत निर्मूलन मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी मैत्री संघटनेचे अध्यक्ष श्रणीत राऊत, उपाध्यक्ष अंकित ठवळी, विनीत उबाळे, प्रतीक राऊत, अमोल निस्वादे, सुभाष पुसाम, राहुल कुकडे आदी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Web Title: Take measures against epidemics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.