स्वत:ला जिंकण्यासाठी स्पर्धांमध्ये भाग घ्या- कुलगुरू
By admin | Published: September 28, 2016 01:09 AM2016-09-28T01:09:03+5:302016-09-28T01:09:03+5:30
चिखली येथील एसपीएम महाविद्यालयात युवा महोत्सवाचे उद्घाटन.
चिखली(जि.बुलडाणा), दि. २७- आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा आहेत. आपण कलावंत म्हणून जेव्हा या स्पर्धांमध्ये भाग घेतो, तेव्हा केवळ ती स्पर्धा जिंकायची, एवढे सीमित उद्दिष्ट न ठेवता, या माध्यमातून स्वत:ला जिंकण्याचे लक्ष्य ठेवून स्पध्रेत भाग घ्यावा. यातून जीवनाचा खरा आनंद गवसत असल्याचा मौलिक विचार कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ह्ययुवा महोत्सव-२0१६ह्णच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने स्थानिक एसपीएम महाविद्यालयात २७ ते ३0 सप्टेंबर दरम्यान ह्ययुवा महोत्सव-२0१६ह्णचे आयोजन करण्यात आले आहे. या युवा महोत्सवाचे उद्घाटन २७ सप्टेंबर रोजी पार पडले. महाविद्यालयाच्या आप्पासाहेब सुळेकर रंगमंचावर पार पडलेल्या या उद्घाटन सोहळय़ाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर होते.
कुलगुरू डॉ.चांदेकर यांनी विद्यापीठाचा समृद्ध वारसा चालविण्याची मोठी जबाबदारी विद्यार्थ्यांवर असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाद्वारे पश्चिम वर्हाडाचे सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी एक मोठे नाट्यगृह आणि विद्यार्थ्यांंसाठी नाट्यशास्त्र विभाग येत्या काळात सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण भागातील लोककला आणि आदिवासी बांधवांचे झाडीपट्टी नाट्यचळवळ जोपासण्यासाठी समस्त कलावंतांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले, तसेच युवा महोत्सवाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे कौतुक केले.
उद्घाटनपर कार्यक्रमास चित्रवाहिनीचे कलाकार अपूर्व रंजनकर, स्नेहा चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. अँड.शीतल मेटकर यांच्या ओडीसी नृत्यातील सुवर्ण वंदनेने उद्घाटन सत्राचा समारोप करण्यात आला.
तत्पूर्वी डॉ.चांदेकर यांच्याहस्ते विद्यापीठ ध्वजावरण करून युवा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. प्रा.एम.टी.देशमुख, डॉ.भोजराज चौधरी, निखिलेश नलावडे, तीर्थराज रॉय, दिवाकर रोईकर, अनिल देशमुख या परीक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी विद्याभारतीचे पश्चिम क्षेत्र उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे, भाजपाचे प्रा.दिनेश सूर्यवंशी, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक प्रा.डॉ. राजेश जयपूरकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण शेटे, सचिव प्रेमराज भाला, अँड.विजय कोठारी, कैलास शेटे, नारायणराव राजपूत, माजी आमदार नानासाहेब लंके, रामदास निमावत, नानासाहेब बाहेकर, अण्णा डांगे, राजाभाऊ खरात, डॉ.भूषण डागा, प्राचार्य डॉ.अभय तारे, प्रा.एम.टी.देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.अभय तारे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन संयोजक प्रा.डॉ.प्रफुल्ल गवई यांनी केले तर आभार प्रा.अनिल पुरोहित यांनी मानले.