नियमित घेऊन वाफ, कोरोनावर करू मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:10 AM2021-04-26T04:10:55+5:302021-04-26T04:10:55+5:30

अमरावती : कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीच्या पालनाबरोबरच चांगला आहार, कोविड सुसंगत जीवनशैली, नियमित वाफ घेणे आदींचा अवलंब केला पाहिजे. त्याबाबत ...

Take regular steam, overcome corona! | नियमित घेऊन वाफ, कोरोनावर करू मात!

नियमित घेऊन वाफ, कोरोनावर करू मात!

Next

अमरावती : कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीच्या पालनाबरोबरच चांगला आहार, कोविड सुसंगत जीवनशैली, नियमित वाफ घेणे आदींचा अवलंब केला पाहिजे. त्याबाबत जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून स्टीम सप्ताह २६ एप्रिल ते २ मे दरम्यान राबविण्यात येत असून, सर्वांनी तो यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी केले.

साथीचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड सुसंगत जीवनशैली, नियमित वाफ घेणे आदी बाबींचे पालन नागरिकांकडून पालन होणे आवश्यक आहे. या विविध आरोग्यतज्ज्ञांच्या सूचनांनुसार जिल्ह्यात स्टीम सप्ताह राबविण्याचा निर्णय पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेत बैठकीत झाला. त्यानुसार ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडून गावोगाव चला वाफ घेऊ या, कोरोनाला हरवूया, या सप्ताहाची अंमलबजावणी होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली.

पालकमंत्र्यांच्या आवाहनानुसार, प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना मोहिमेबाबत सूचना देण्यात आली आहे. सोमवारपासून गावोगाव हे अभियान राबविण्यात येईल, असेही डॉ. रणमले यांनी सांगितले. कोरोना विषाणूला हरविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. विविध आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व कोरोनावरील अनुभव व अभ्यासानंतर असे निदर्शनास आले की, कोरोना विषाणूला पूर्णपणे हरविण्यासाठी या लढाईत सर्वांचेच प्रयत्न आवश्यक आहेत. प्रत्येक घरातून त्याचा कायमचा समूळ नायनाट करण्याचा प्रयत्न "स्टीम सप्ताह" राबवून आपल्याला करायचा आहे. मास्क लावणे, अंतर ठेवणे, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहार, व्यायाम, सुसंगत जीवनशैलीचा अवलंब यात वाफ घेणे ही कृतीही समाविष्ट आहे, असेही डॉ. रणमले यांनी सांगितले.

वाफ घेण्यासारखी बाब आपल्याला तशी परिचित आहे. सध्याच्या काळात तिचे महत्व मोठे आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून तिचे महत्त्व प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्यासाठी उपयोग होणार आहे. यानिमित्ताने प्रत्येकाने मी कोरोनाला हरविणारच हा निर्धार केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

बॉक्स १

अशी घ्या वाफ

वाफ घेण्याबरोबरच व्हिटॅमिन सी गोळया, झिंक गोळ्या व मल्टिव्हिटॅमिन गोळ्या घेण्याबाबत आहार व योग करण्याबाबतही विविध आरोग्यतज्ज्ञांनी सुचविले दिवसातून तीन वेळा वाफ घ्यावयाची आहे. आपल्या नाकाव्दारे वाफेस श्वासाव्दारे शरीरात ओढणे व तोंडाने बाहेर सोडण्याची ही प्रक्रिया १० वेळा करावयाची आहे. या प्रक्रियेकरिता दोन किंवा ३ मिनिटे लागतात. तसेच साध्या पाण्याने वाफ घेतली तरीही उत्तम आहे. आरोग्य विभागातील विविध आरोग्यतज्ञांनी या वाफ घेण्याच्या पद्धतीला कोरोना विषाणूला हद्दपार करण्याकरिता अत्यंत उपयोगी प्रक्रिया पडू शकते, असा विश्वास व्यक्त केलेला आहे. जर दररोज तिन वेळा वाफ घेतली तर कोरोना संसर्गावर नियंत्रणाकरिता मदत मिळू शकते. वाफेमुळे कोरोना विषाणूचा नाश होऊ शकतो असे मत व्यक्त केलेले आहे.

यांचेकडे आहे जबाबदारी

ही मोहीम यशस्वी करण्याकरिता आपण जनतेला ही प्रक्रिया अवलंबिण्यासाठी स्थानिक पदाधिकारी, विविध विभागातील कर्मचारी गाव पातळीवरील योग प्रशिक्षक, गावकरी, युवापिढी तसेच लोकांमार्फत प्रसार व प्रसिद्धी करण्याबाबतचे आवाहन जि. प. अध्यक्ष बबलू देशमुख, आरोग्य व वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी रेवती साबळे, माताबाल संगोपन अधिकारी विनोद करंजेकर, दिलीप च-हाटे तसेच संपूर्ण तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून कार्यवाही होत आहे.

Web Title: Take regular steam, overcome corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.