विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाईन घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:15 AM2021-02-16T04:15:29+5:302021-02-16T04:15:29+5:30

कॅप्शन - निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेड, एआयएसएफचे कार्यकर्ते. संभाजी ब्रिगेड, एआयएसएफची मागणी, कोरोना संसर्गाची ...

Take the university convocation ceremony online | विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाईन घ्या

विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाईन घ्या

googlenewsNext

कॅप्शन - निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेड, एआयएसएफचे कार्यकर्ते.

संभाजी ब्रिगेड, एआयएसएफची मागणी, कोरोना संसर्गाची वाढती संख्या धोकादायक

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २१ फेब्रुवारी रोजी होऊ घातला आहे. मात्र, गत काही दिवसांपासून कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दीक्षांत समारंभ ऑनलाईन घेण्यात याव्या, अशी मागणी एआयएसएफ, संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदनातून केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी १२ फेब्रुवारी रोजी आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार अमरावती शहर व ग्रामीण भागाकरिता संचारबंदी व जमावबंदीचे आदेश २८ फेब्रुवारीपर्यंत लागू केले आहे. त्यामुळे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाईन घेण्याबाबत प्रशासनाने विद्यापीठाला अवगत करावे, असे निवेदनातून

म्हटले आहे.

दीक्षांत समारंभासाठी विभागातून विद्यार्थी, पालक उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. परिणामी ऑफलाईन समारंभाचे आयोजन झाल्यास अमरावती विभागात कोरोनाचा उद्रेक होण्याचे संकेत आहे. पदवीदान समारंभ हा ऑनलाईन घेऊनच विद्यार्थ्यांचे आरोग्य जपावे, अशी मागणी करण्यात आली आहे.उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना निवेदनाच्या माध्यमातून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विनंती करण्यात आली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शुभम शेरकर, एआयएसएफचे जिल्हा सचिव योगेश चव्हाण, नेशन फस्ट आंदोलनाचे मयूर राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(निवेदन देताना फोटो आहेत)

Web Title: Take the university convocation ceremony online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.