पहिले पॉझिटिव्ह कुटूंब घेताहेत, स्वत:च्या परिवारासह समाजबांधवांचीही काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:10 AM2020-12-29T04:10:59+5:302020-12-29T04:10:59+5:30
(असाईनमेंट) अमरावती : जिल्ह्यातील पहिला कोरोना ‘होमडेथ’ त्यानंतर या परिवारातील २४ व्यक्तींना पीडीएमसीत व्कारंटाईन करण्यात आले होते. यापैकी चार ...
(असाईनमेंट)
अमरावती : जिल्ह्यातील पहिला कोरोना ‘होमडेथ’ त्यानंतर या परिवारातील २४ व्यक्तींना पीडीएमसीत व्कारंटाईन करण्यात आले होते. यापैकी चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. हे सर्व जन आता ठणठणीत बरे झाले आहेत. या सर्व सदस्यांद्वारा स्वत:च्या परिवारासह इतरांचीही काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे आरोग्य यंत्रणेला मोठे सहकार्य या परिवाराकडून मिळत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.
जिल्ह्यात ३ एप्रिलच्या रात्री पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली. हाथीपुऱ्यातील ४५ वर्षीय व्यक्ती आजारी असल्याने त्यांचे घरीच निधन झाले. आरोग्य यंत्रणेद्वारा त्यांचा थ्रोट स्वॅब घेऊन तपासणीला पाठविला असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मृताच्या संपर्कातील व परिवारातील २४ व्यक्तींना येथील डॉ. पंजाबराब देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात क्वारंटाईन केले होते व त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीला पाठविले असता चार नमुने पॅझिटिव्ह आलेत. त्यांना येथील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. यात मृत पॉझिटिव्हची पत्नी, दोन भाऊ, मुलगा यांचा समावेश होता.
उपचारादरम्यान बरे वाटल्यानंतर त्यांचा १४ व्या दिवशी स्वॅब तपासणीला पाठविण्यात आला. तो निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा सलग दोन वेळा तपासणी करण्यात आली व तेही निगेटिव्ह आल्यानंतर १८ व्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या सर्व व्यक्तींना १४ दिवस घरीच विलगीकरणात राहावे लागले. या सर्व व्यक्ती संक्रमणमुक्त झाल्या तेव्हा त्यांच्या स्वागताला स्वत: जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सी.एस. श्यामसुंदर निकम यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
बॉक्स
पहिल्या कोरोनाग्रस्ताची हिस्ट्रीच नाही
जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाग्रस्ताची हिस्ट्रीच आरोग्य विभागाकडे नाही. त्यांचा आर्मेचेरचा व्यवसाय असल्याने काही गाड्यांच्या दुरुस्तीसाठी ते अकोला व अमरावती जिल्ह्यातील काही भागात गेले होते. पोलिसांद्वारा कॉल ट्रेसींगद्वारे एवढीच माहिती समोर आली आहे. याशिवाय ते कोमार्बिड रुग्ण होते. त्यामुळे ते कुणाच्या संपर्कात आले व त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, ही माहिती अद्यापही निष्पन्न झालेली नाही.
बॉक्स
प्लाझ्मा दान अन् रक्तदानही
या परिवारातील व्यक्ती उपचारानंतर बरे झालेत. त्यांच्याद्वारा या नऊ महिन्यांत परिवारातील सदस्यांची काळजी तर घेतली जात आहे. याशिवाय समाजबांधवांचीही काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे आरोग्य यंत्रणेनाही मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत आहे. समाजात जनजागृती करीत आहेत. दोन वेळा रक्तदान शिबिरही घेण्यासोबतच या परिवारातील सदस्यांनी प्लाझ्मादेखील दान केलेला आहे.
ग्राफ
प्रत्येक महिन्याला असे वाढले रुग्ण
४ एप्रिल - ०१
१ मे - ४०
१ जून -२१८
१ जुलै-५६९
१ ऑगस्ट-२१५७
१ सप्टेंबर -५७५०
१ ऑक्टोबर-१३३३३
१ नोव्हेंबर -१६३०२
१ डिसेंबर-१७८८६
२८ डिसेंबर -१९,३९६