पीडीएमसीमधून रेमडेसिविर घेऊन छिंदवाड्यात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:17 AM2021-04-30T04:17:09+5:302021-04-30T04:17:09+5:30
कॅप्शन - छिंंदवाडा पोलिसांनी अजिंक्य ठाकरेकडून जप्त केलेले रेमडेसिविर -------------------------------------------------------------------------- अमरावतीच्या युवकाला अटक, सहा व्हायल जप्त, रुग्ण दाखल ...
कॅप्शन - छिंंदवाडा पोलिसांनी अजिंक्य ठाकरेकडून जप्त केलेले रेमडेसिविर
--------------------------------------------------------------------------
अमरावतीच्या युवकाला अटक, सहा व्हायल जप्त, रुग्ण दाखल असल्याचा बनाव करून मिळवायचा व्हायल
सुनील चौरसिया : अमरावती : शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वितरण केंद्रावरून रेमडेसिविर मिळवून त्याची चढ्या दराने छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथे विक्री करीत असताना गुरुवारी अमरावतीतील एका युवकाला तेथील पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सहा व्हायल जप्त करण्यात आल्या.
पोलीस सूत्रांनुसार, अजिंक्य प्रफुल्ल ठाकरे (२४, रा. शुभम ले-आऊट, रोहणी पार्क, गाडगेनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो अमरावती येथून रेमडेसिविर आणून चढ्या दरात विकत असल्याची माहिती छिंदवाडा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे सापळा रचून अजिंक्यला अटक करण्यात आली. ही कारवाई छिंदवाड्याचे पोलीस अधीक्षक विवेक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार महेंद्र भगत, पोलीस कॉन्स्टेबल शिवकरण पांडे, शैलेंद्र मरकाम, ओमवीर जाट यांनी केले.
बॉक्स:
रुग्ण दाखल असल्याचा बनाव
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शासकीय दरात रेमडेसिविर वितरणाचे केंद्र आहे. तेथे कोरोनाग्रस्तांकरिता दस्तऐवज दाखविल्यानंतर ही व्हायल दिली जाते. आधीच तुटवडा असल्याने बाजारात या इन्जेक्शनची चढ्या दराने विक्री होते. या स्थितीचा फायदा घेण्यासाठी अजिंक्य ठाकरे याने कोरोनाग्रस्त नातेवाईक दाखल असल्याचे दस्तऐवज बनवून प्रत्येक वेळी रेमडेसिविर मिळवित होता. याप्रकरणी आशु नामक युवक मदत करीत होता, असे त्याने छिंदवाडा पोलिसांच्या चौकशीत सांगितले.
कोट
आमच्याकडे या प्रकरणाची कुठलीही माहिती तूर्तास नाही. तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.
- डॉ. अनिल देशमुख, अधिष्ठाता, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय