बग्गी येथे तळेगाव दशासर पोलिसांची जुगारावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:17 AM2021-09-04T04:17:05+5:302021-09-04T04:17:05+5:30

५ आरोपी ताब्यात, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त चांदूर रेल्वे - (ता. प्र.) बग्गी येथे तळेगाव दशासर पोलिसांची जुगारावर धाड ...

Talegaon Dashasar police raid gambling at Buggy | बग्गी येथे तळेगाव दशासर पोलिसांची जुगारावर धाड

बग्गी येथे तळेगाव दशासर पोलिसांची जुगारावर धाड

Next

५ आरोपी ताब्यात, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदूर रेल्वे - (ता. प्र.)

बग्गी येथे तळेगाव दशासर पोलिसांची जुगारावर धाड

५ आरोपी ताब्यात, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदूर रेल्वे - (ता. प्र.)

चांदूर रेल्वे तालुक्यातील व तळेगाव दशासर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बग्गी येथे तळेगाव पोलिसांनी २ सप्टेंबरला जुगारावर धाड टाकली. यात ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार अजय आकरे यांच्या आदेशाने करण्यात आली.

ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन., अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजय आकरे यांच्या आदेशाने २ सप्टेंबर रोजी पेट्रोलिंगदरम्यान गोपनीय माहितीवरून तळेगाव पोलीस जुगार रेड करण्याकरिता गेले असता बग्गी येथे काही इसम जुगार खेळताना मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १० हजार ३२० रुपये नगदी, ५ मोटारसायकल किंमत अंदाजे २ लाख ६० हजार रुपये, ६ मोबाइल किंमत अंदाजे ३१ हजार रुपये असा एकूण ३ लाख १ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी प्रवीण दामाजी उरकुडे (वय ४५ वर्षे), मनोहर ज्ञानेश्वर वैद्य (वय ५० वर्षे), संतोष गुलाबराव गोडबोले (वय ३६ वर्षे), अक्षय दिलीप स्वर्गे (वय २४ वर्षे), सर्व रा. बग्गी व प्रशांत यशवंत गणवीर (वय ३७ वर्षे), रा. निंभा यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई हे.काॅ. संतोष सांगळे, ना.पो.काॅ. मनीष आंधळे, श्यामकुमार गावंडे, पो.काॅ. पवन महाजन, संदेश चव्हाण, मनीष कांबळे, अंकुश पाटील, चालक संजय राऊत यांनी केली.

030921\img-20210903-wa0022.jpg

photo

Web Title: Talegaon Dashasar police raid gambling at Buggy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.