तळेगाव दशासरला अवैध सावकाराचे घरी ‘सहकार’ची धाड
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 1, 2024 07:21 PM2024-03-01T19:21:11+5:302024-03-01T19:21:27+5:30
खरेदीखत, कच्च्या नोंदी असलेल्या डायरीसह अन्य दस्तऐवज जप्त
अमरावती : धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील रमेश नारायण जयसिंगपूरे यांच्याविरुद्ध असलेल्या अवैध सावकारीच्या तक्रारीवरुन सहकार विभागाचे शुक्रवारी धाड मारली. यामध्ये खरेदी खत, कच्च्या नोंदी असलेल्या डायरीसह अन्य दस्तऐवज जप्त करण्यात आले आहे.
सहकार विभागाला अवैध सावकारी संदर्भात तक्रार प्राप्त होताच याची प्रथम खातरजमा करण्यात आली व विभागीय सहनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निबंधक गजानन डावरे, सहकार अधिकारी वाय. डी. खोब्रागडे, सरिता गोडबोले सहायक सहकार अधिकारी विनोद वरकड, सचिन अढाऊ यांच्या पथकाने शुक्रवारी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनूसार ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी दिली.