तळेगाव दशासर बस थांब्याजवळ ट्रकला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:54 PM2018-09-01T23:54:58+5:302018-09-01T23:55:07+5:30
तालुक्यातील तळेगाव दशासर येथील बस थांब्याजवळ दहा टायर ट्रकचे समोरील एक्सल तुटल्यामुळे दुभाजकाला भिडल्याने डिझेल टॅंक फुटून भीषण आग लागली.
धामणगाव रेल्वे (अमरावती) : तालुक्यातील तळेगाव दशासर येथील बस थांब्याजवळ दहा टायर ट्रकचे समोरील एक्सल तुटल्यामुळे दुभाजकाला भिडल्याने डिझेल टॅंक फुटून भीषण आग लागली. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता सुमारास घडली. यातील ट्रक चालकासह कंडक्टरचा शोध लागलेला नाही. आग इतकी भीषण होती की 100 मिटर अंतरावरून बघ यांनी घटनेची माहिती घेण्याकरिता गर्दी केली होती .
देवगाव येथून सोयाबीन होते घेऊन निघालेल्या दहा चाकी भरधाव ट्रक नागपूर औरंगाबाद हायवेवरून अमरावतीकडे येत असताना तळेगाव दशासर च्या बस थांब्याजवळ अचानक एक्सेल तुटल्यामुळे थेट दुभाजकाला घासत गेल्याने डिझेल टॅंक फुटले आणि घर्षण होऊन तक्षण आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. घटनास्थळाहून हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये ज्वलनशील गॅस सिलेंडर असल्यामुळे अनुचित घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती हॉटेल संचालकांनी तातडीने सिलेंडर बंद करून बाहेर ठेवण्याची सूचना नोकरांना केली होती. खाली वर नियंत्रण मिळविण्याकरिता तेथील काही लोकांनी चांदुर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे येथील अग्निशमन दलाला पाचारण केले परंतु रात्रीची वेळ असल्याने एक तास उशिराने चांदुर रेल्वे येथील अग्निशमन दल पोहोचले आणि शर्तीचे प्रयत्न करू लागले मात्र धामणगाव रेल्वे येथील अग्निशमन दलाचे वाहन अद्याप पोहोचलेले नाही आगीचे वृत्त लिहिस्तोवर ट्रक चालक व यांच्यासोबत किती व्यक्ती ट्रकमध्ये बसलेले असतील याची माहिती मिळू शकली नाही.
ट्रक चालकासह कंडक्टरदेखील नागरिकांपर्यंत पोहोचले नसल्यामुळे त्यांचे काय झाले, हे अद्याप कळू शकलेले नाही. घटनेची माहिती तळेगाव पोलिसांना मिळाली असता ते घटनास्थळी पोहोचले परंतु आग नियंत्रणात आली नसल्यामुळे पंचनामा केल्यानंतर सविस्तर माहिती मिळू शकेल.