काजळी परिसरातही वाघाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 01:15 AM2018-11-09T01:15:59+5:302018-11-09T01:16:45+5:30

तालुक्यातील काजळी गावापासून एक किलोमीटर अंतरावरील शेतामध्ये ओलित करीत असताना शेतमजुराला वाघ दिसल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. तीन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या या चर्चेमुळे परिसरातील नागरिकांनी वाघाची चांगलीच धास्ती घेतली आहे.

Talk about Tiger in Kajali area | काजळी परिसरातही वाघाची चर्चा

काजळी परिसरातही वाघाची चर्चा

Next
ठळक मुद्देमाग काढण्यात अपयश : तडशाबाबत वनविभाग ठाम

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यातील काजळी गावापासून एक किलोमीटर अंतरावरील शेतामध्ये ओलित करीत असताना शेतमजुराला वाघ दिसल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. तीन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या या चर्चेमुळे परिसरातील नागरिकांनी वाघाची चांगलीच धास्ती घेतली आहे. वनविभागाने सदर वन्यपशू वाघ नसून, तडशा असण्याची शक्यता वर्तविली. तथापि, या वन्यपशूचा शोध घेण्यात वनविभाग अपयशी ठरत आहे.
माधान शिवारात कापूस वेचणीला गेलेल्या महिलांना वाघ दिसल्याची चर्चा संपत नाही तोच पुन्हा माधानपासून सहा-सात किलोमीटर अंतरावरील काजळी शिवारात वाघ दिसल्याची चर्चेमुळे परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काजळी शिवारातील शेतात वाघ दिसल्याची माहिती चांदूर बाजार पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर वनविभागाला माहिती कळविण्यात आली. वनविभागाने या ठिकाणी भेट देऊन जनावराच्या पायांचे ठसे घेतले. तथापि, हे पदचिन्ह वाघाचे नसून, तडशा या जनावराचे असू शकते, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
नागरिकांमध्ये चर्चेला उधाण
गेल्या तीन ते चार दिवसांपासून तालुक्यात वाघ शिरल्याची चर्चा आहे. मात्र, जीवितहानीची तालुक्यात कोणतीही घटना झाली नाही. त्यामुळे यात कितपत सत्यता आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. हा वन्यपशू वाघ नसून, तडशा असल्याचा निर्वाळा वनविभागाने माधानपाठोपाठ काजळी घटनास्थळीही जाहीर केले. तरीही नागरिकांमध्ये भीती कायम आहे. त्यामुळे वनविभागाने या जनावराचा त्वरित शोध घेणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
दहशत नरभक्षक वाघाची
सदर वन्यप्राणी वाघ नसून, कोल्हा किवा तडशा असू शकतो. नरभक्षी वाघ या परिसरापासून १२५ किमी दूर मध्य प्रदेश सीमेत आहे.
- गणेशशिंग ठाकूर
वनपाल

Web Title: Talk about Tiger in Kajali area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ