पीआरसीकडून तालुक्यांची झाडाझडती
By admin | Published: November 7, 2015 12:19 AM2015-11-07T00:19:04+5:302015-11-07T00:19:04+5:30
जिल्हा परिषदेचा आर्थिक आढावा घेतल्यानंतर पंचायतराज समितीने दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंचायत समिती स्तरावरच्या पाहणीचे नियोजन केले.
भारसाकळे गृह तालुक्यात : आज पुन्हा बैठक, अधिकारी धास्तावले
अमरावती : जिल्हा परिषदेचा आर्थिक आढावा घेतल्यानंतर पंचायतराज समितीने दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंचायत समिती स्तरावरच्या पाहणीचे नियोजन केले. शुक्रवारी पंचायतराज समितीचे प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपले सहकारी आ. राजेंद्र नजरधने आणि आ. अमित झनक यांच्यासह अमरावती, च ांदूररेल्वे व नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचा धांडोळा घेतला.
अकोटचे भाजपाचे आ.प्रकाश भारसाकळे, आ.आर. टी. देशमुख आणि आ. भीमराव तापकीर यांनी अवर समिती सचिव तथा गटसचिव प्रदीप मयेकर आणि प्रतिवेदक महेंद्र सांगळे यांच्यासह दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर आणि चांदूरबाजार पंचायत समितीमधील कामकाजाची पाहणी केली. विधान परिषद सदस्य तथा गटप्रमुख पांडूरंग फुंडकर यांच्या नेतृत्वात भरतसेठ गोगावले, विकास कुंभारे तथा आ. समीर कुणावार यांच्याकडे धारणी आणि चिखलदरा पंचायत समितीची जबाबदारी सोपविण्यात आली. पी. व्ही. खर्चे हे त्यांच्यासोबत होते. तिवसा, मोर्शी, वरूड आणि भातकुली या चार पंचायत समितीच्या अखत्यारित येणाऱ्या कामकाजाचा आढावा गटप्रमुख आ. रामहरी रुपनवर यांच्यासह आ. राजाभाऊ वाजे, आ. हेमंत पाटील यांनी घेतला. (प्रतिनिधी)