अशोकनगर, शेंदूरजना खुर्द येथे आगीचे तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:13 AM2021-04-01T04:13:39+5:302021-04-01T04:13:39+5:30
तापमान वाढले, कुटार पेटले, शिवारातील ढिगाने गावाला वेढा घालण्याचा धोका धामणगाव रेल्वे : वाढत्या तापमानामुळे अचानक आगी लागण्याच्या घटनांना ...
तापमान वाढले, कुटार पेटले, शिवारातील ढिगाने गावाला वेढा घालण्याचा धोका
धामणगाव रेल्वे : वाढत्या तापमानामुळे अचानक आगी लागण्याच्या घटनांना मंगळवारी धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदूरजना खुर्द व अशोकनगर येथून सुरुवात झाली आहे. दोन्ही गावांलगतच्या शेतात असलेल्या कुटाराला आग लागली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळविले.
तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथे बुधवारी दुपारी १२ वाजता दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या कुटाराला आग लागली. हे कुटार गावाशेजारी असल्यामुळे आग गावाला वेढणार, अशी भीती व्यक्त होत होती. यादरम्यान धामणगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. यादरम्यान दुपारी ३ वाजता दरम्यान अशोकनगर येथे शेतातील कुटाराला आग लागल्यामुळे अग्निशमन यंत्राने तिकडे धाव घेतली व आग विझवली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर परिषद अग्निशमन दलाचे जवान हितेश गावंडे, हेमंत कापसे, सतीश उईके, प्रशांत रोकडे, संतोष आत्राम आदींनी परि॰म घेतले.