मोर्शी तालुक्यात टंचाईग्रस्त गावांना टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:12 AM2021-03-22T04:12:14+5:302021-03-22T04:12:14+5:30
मोर्शी : तालुक्यातील दरवर्षी भीषण टंचाई आढळून येणाऱ्या गावांमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी पाणीपुरवठ्यासाठी टँकर उपलब्ध केले आहेत. हिवरखेड, ...
मोर्शी : तालुक्यातील दरवर्षी भीषण टंचाई आढळून येणाऱ्या गावांमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी पाणीपुरवठ्यासाठी टँकर उपलब्ध केले आहेत.
हिवरखेड, रिद्धपूर, अंबाडा, पिंपळखुटा (मोठा), आष्टोली, धानोरा, तरोडा या गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर वाटप करण्यात आले. या पिण्याच्या पाण्याच्या टँकरमधून ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामस्थांना पाणी देण्यात येणार आहे तसेच गावखेड्यात लग्न सोहळ्यासह विविध कार्यक्रमांनासुद्धा या टॅंकरद्वारे पाणी पुरविल्या जाणार आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू साऊत, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन मडघे, नगरसेवक प्रदीप कुऱ्हाडे, पिंटू महल्ले, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष हितेश साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहरप्रमुख अंकुश घारड, विलास ठाकरे, घनश्याम कळंबे, हिवरखेड येथील सरपंच विजय पाचारे, रिद्धपूर येथील सरपंच गोपाल जामठे, आष्टोली येथील सरपंच नंदकिशोर कोहळे, धानोरा येथील सरपंच दिनेश जवंजाळ, अंबाडा येथील सरपंच अमोल कडू, तरोडा येथील सरपंच उषा अढाऊ, पिंपळखुटा येथील सरपंच शुभांगी मोगरकर यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी मंडळी उपस्थित होती.