घनदाट अरण्यातील तपोवनेश्वर भक्तांच्या गर्दीने फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:15 AM2021-08-23T04:15:29+5:302021-08-23T04:15:29+5:30

फोटो - पोहरा २२ पी पोहरा बंदी : घनदाट अरण्यात वसलेल्या तीन डोंगरांच्या कुशीत तपोवनेश्वर शिवमंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ...

Tapovaneshwar in the dense forest blossomed with a crowd of devotees | घनदाट अरण्यातील तपोवनेश्वर भक्तांच्या गर्दीने फुलले

घनदाट अरण्यातील तपोवनेश्वर भक्तांच्या गर्दीने फुलले

Next

फोटो - पोहरा २२ पी

पोहरा बंदी : घनदाट अरण्यात वसलेल्या तीन डोंगरांच्या कुशीत तपोवनेश्वर शिवमंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तपस्वीच्या तपाने पावन झालेले तपोवनेश्वर मंदिर संस्थानचे पदाधिकारी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

श्रावण महिन्यात दर सोमवारी तेथे भाविकांची गर्दी राहत होती. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंदिरात भाविकांची वर्दळ कमी प्रमाणात दिसून येत आहे. येथील अखंड प्रज्ज्वलित धुनी हे भाविकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. हे देवस्थान अमरावतीपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी महाशिवरात्री व श्रावण महिन्यात हर्षोल्हासात व भक्तिभावाने साजरा केला जातो. श्रावण सोमवारी पहाटे दुग्धाभिषेक पूजन, दीप पूजन, तीर्थस्थापना, होमहवन, महापूजा करण्यात येते. दर सोमवारी याठिकाणी महाआरती व भजनाचे आयोजन केले जाते. महादेवाच्या पिंडीला पुष्पहारानी सजवून मंदिर परिसरात रोषणाई करतात. येथील लक्ष्मी-नारायणाचे हेमाडपंथी मंदिर असून भुयाराच्या आतमध्ये चार दरवाजे आहे. हा मार्ग सालबर्डी, अंबादेवी, पाताळेश्वर मंदिर येथे निघत असल्याचे सांगण्यात येते. तपोवनेश्वर-पाताळेश्वराची पायदळ वारी केल्यास काशीची यात्रा केल्याचे पुण्य लाभते, अशी आख्यायिका आहे. सीताराम महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी पेटविलेली अखंड धुनी आजही येथे जळत आहे. या मंदिरातील कार्यकारिणी मंडळी व्यवस्था पाहत आहेत.

बाॅक्स

संततधार पावसामुळे या तलावाची पातळी वाढली. सावंगा, पोहरा, चिरोडी, भिवापूर, कारला, शेवती, वडाळी, इंदला, गोविंदपूर, छत्रीतलाव, माळेगाव, मार्डी, धोतरखेडा तलावाचे विहंगम दृश्य झाले आहे.

Web Title: Tapovaneshwar in the dense forest blossomed with a crowd of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.