कोरोना लसीकरणासाठी टास्क फोर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:30 AM2020-12-12T04:30:25+5:302020-12-12T04:30:25+5:30
--------------------- लसीचे दोन डोज मिळेल लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी डीप फ्रिजर, आईसलाईन रेफ्रिजेरेटर, शीत साखळी केंद्रे, व्हॅक्सिन कॅरीअर, कोल्ड बॉक्स ...
---------------------
लसीचे दोन डोज मिळेल
लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी डीप फ्रिजर, आईसलाईन रेफ्रिजेरेटर, शीत साखळी केंद्रे, व्हॅक्सिन कॅरीअर, कोल्ड बॉक्स पॅक आदी साधन सामग्री सज्ज ठेवावी. कोरोना प्रतिबंधक दोन लसींचा डोज आहे. पहिली लस टोचल्यानंतर एक महिन्याने दुसरी लस टोचली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे. त्यानुसार लसीकरण केंद्राची ठिकाणे निश्चित केले जातील. लसीकरण पथके तयार करावीत व त्यांना प्रशिक्षण द्यावेत आदी निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
----------------------
लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज
जिल्हा सामान्य रुग्णालयासह ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १४ ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये, एक वैद्यकीय महाविद्यालय, १३ नागरी आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण केंद्रे उघडण्यात येतील. जिल्ह्यात ४ हजार ४८१ व्हॅक्सिन कॅरीअर, १३४ डीप फ्रिजर, १३३ आईसलाईन रेफ्रिजेरेटर, २५५ कोल्ड बॉक्स आदी साधने सज्ज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी रणमले यांनी दिली.
---------------------
सामान्यांना चौथ्या टप्प्यात लस
लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात सामान्य नागरिकांना लस टोचली जाणार आहे. त्यासाठी वेबसाईट व ॲपवर लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्यात येणार आहे. नाव, पत्ता, आधारकार्ड अपलोड केल्यानंतर मोबाईल नंबरवर मॅसेज येणार आहे. लसीकरणाची तारीख, वेळ व ठिकाण कळविले जाईल.