अमरावती जिल्ह्यात लसीकरणासाठी 'टास्क फोर्स' सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 01:08 PM2020-12-12T13:08:04+5:302020-12-12T13:09:26+5:30

Amravati news corona कोरोना लसीकरण लवकरच होणार आहे. लसीकरणाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुकास्तरीय टास्क फोर्स स्थापन केले आहेत.

Task Force ready for vaccination in Amravati district | अमरावती जिल्ह्यात लसीकरणासाठी 'टास्क फोर्स' सज्ज

अमरावती जिल्ह्यात लसीकरणासाठी 'टास्क फोर्स' सज्ज

Next
ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात १६ हजारांवर हेल्थ केअर वर्करना कोरोना लस, शीत केंद्र तयार

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : कोरोना लसीकरण लवकरच होणार आहे. लसीकरणाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुकास्तरीय टास्क फोर्स स्थापन केले आहेत. शीत साखळी केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. डीप फ्रीजर, आईसलाईन रेफ्रिजरेटर सज्ज ठेवण्यात आले आहेत. पहिल्या टप्यात १६ हजार २६१ हेल्थ केअर वर्कर यांचे लसीकरण होणार आहे. लसीकरणाची पूर्वतयारी जोरात सुरू आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, लसीकरणासंदर्भात जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय टास्क फोर्स स्थापन झाले आहेत. जिल्हास्तरावरील फोर्सचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आयएमएचे प्रतिनिधी, धार्मिक नेते यांच्यासह २५ प्रतिनिधींचा समावेश आहे. तालुकास्तरीय टास्क फोर्समध्येही २० ते २२ प्रतिनिधींचा समावेश आहे. जिल्हाधिका?्यांकडून टास्क फोर्सवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर संबंधितांना कळविले जाणार आहे. कोरोनाच्या लशींसाठी आरोग्य यंत्रणेकडील उपलब्ध शीत साखळी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. जिल्ह्यात १०१ शीत साखळी केंद्रे आहेत. डीप फ्रीजर १३४, त्याची क्षमता १३१३२ लिटर इतकी आहे. आईसलाईन रेफ्रिजरेटर १३३ आहेत. व्हॅक्सिन कॅरिअर ४४८१, कोल्ड बॉक्स २५५ आहेत. कोल्ड बॉक्स पॅक हे उणे १५ ते उणे २५ अंश सेल्सिअस तापमानाला गोठवलेले असतात.

दोन लशींचा डोस
कोरोना प्रतिबंधक दोन लशींचा डोज आहे. पहिली लस टोचल्यानंतर एक महिन्याने दुसरी लस टोचली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्करना लस टोचली जाणार आहे. शासकीय, निमशासकीय आरोग्य यंत्रणा, खासगी आरोग्य यंत्रणेकडील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण होणार आहे. ग्रामीण भागातील १३० संस्थांमधील ७५७० शासकीय, तर ३८६ खासगी संस्थांमधील ८६९१ अशा एकूण ५१५ संस्थामधील १६ हजार २६१ हेल्थ केअर वर्करना लसीकरण होणार आहे. लस उपलब्ध होण्यास अवकाश असला तरी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

लसीकरणाची तारीख, वेळ मोबाईलवर
लसीकरणाच्या चौथ्या टप्यात सर्वसामान्य व्यक्तींना (हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, हायरिस्क व ५० वर्षावरील व्यक्ती वगळून उर्वरित सर्व व्यक्ती) लस टोचली जाणार आहे. वेबसाईट अथवा अ?ॅपवर लसीकरणासाठी नावनोंदणी करता येणार आहे. नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर अपलोड केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर मेसेज येणार आहे. लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण याची माहिती या मेसेजद्वारे कळविली जाणार आहे. लसीकरण झाल्याचे आॅनलाईन प्रमाणपत्रही मिळणार आहे. ते सेव्ह करून ठेवता येईल.

..........................................................................................................................................

Web Title: Task Force ready for vaccination in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.