तिवसा येथे उपविभागीय कार्यालय खेचून आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:21 AM2019-04-12T01:21:08+5:302019-04-12T01:22:38+5:30

राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख शहर असलेल्या तिवसा येथे उपविभागीय कार्यालयाची निर्मिती केली जाईल. त्याकरिता शासनासोबत दोन हात करू, पण कार्यालय खेचून आणू, असा संकल्प अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार नवनीत रवि राणा यांनी बुधवारी तिवसा व कुºहा येथे जाहीर सभेत केला.

Tavasa pulls sub-divisional offices here | तिवसा येथे उपविभागीय कार्यालय खेचून आणू

तिवसा येथे उपविभागीय कार्यालय खेचून आणू

Next
ठळक मुद्देनवनीत रवि राणा यांचा संकल्प : सुनील शेट्टी यांची जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख शहर असलेल्या तिवसा येथे उपविभागीय कार्यालयाची निर्मिती केली जाईल. त्याकरिता शासनासोबत दोन हात करू, पण कार्यालय खेचून आणू, असा संकल्प अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार नवनीत रवि राणा यांनी बुधवारी तिवसा व कुºहा येथे जाहीर सभेत केला. यावेळी अभिनेता सुनील शेट्टी यांची झलक बघण्यासाठी परिसरातील युवक, महिला, असंख्य नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
मंचावर रिपाइं (गवई गट) राष्ट्रीय महासचिव डॉ. राजेंद्र गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वºहाडे, तिवसा नगरपंचायतीचे अध्यक्ष वैभव नावखडे, संपर्कप्रमुख जितू दुधाने, नितीन मोहोड, हरिभाऊ मोहोड, एजाज पटेल, फिरोज शाह, माजी सभापती दिलीप काळबांडे, महादेव गारपवार, डॉ. तंवर, धीरज केने, संदेश मेश्राम, काळे, निंदाने, पप्पू देशमुख, सय्यद जहांगीर, संदीप आमले, मुकुंद देशमुख आदी उपस्थित होते.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील मतदारांचा आशीर्वाद घेऊन दिल्लीत शेतकऱ्यांच्या समस्या, प्रश्न सोडविण्याची ग्वाही नवनीत राणा यांनी दिली. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रही मागणी केली जाईल. प्रसंगी शेतकºयांसाठी रस्त्यावरची लढाई लढण्यास मागेपुढे बघणार नाही, असा ठाम विश्वास नवनीत राणा यांनी मतदारांना दिला. निराधार महिला, पुरुषांना ६०० ऐवजी दोन हजार रुपये मानधन मिळण्याकरिता शासनाविरुद्ध एल्गार पुकारला जाईल. आमदार यशोमती ठाकूर आणि मी आम्ही दोघीही सोबतीने तिवस्यात विकासाची गंगा आणली जाईल, असे त्या म्हणाल्या.

सुनील शेट्टी म्हणाला, सभी नटो का एक ही पाना...
महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ तिवसा व कुºहा येथे बुधवारी जाहीर सभेत अभिनेता सुनील शेट्टी यांची उपस्थिती मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरला. सुनील शेट्टी व्यासपीठावर येताच एकच जल्लोष झाला. त्यांची छबी टिपण्यासाठी एकाच वेळी हजारो मोबाइल सरसावले. दरम्यान अभिनेता शेट्टी यांच्या ‘सभी नटो का एकही पाना, चुनकर लाना है नवनीत राणा’ असा संवादाला उपस्थित हजारो मतदारांनी टाळांच्या कडकडाट केला.
वडाळी, किरणनगर भागाचा विकास करू
अमरावती शहरातील वडाळी, किरणनगर भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरीव निधी आणला जाईल. वडाळी तलाव, छत्री तलावाच्या धर्तीवर किरणनगरात भव्यदिव्य उद्यानाची निर्मिती करण्याची ग्वाही नवनीत रवि राणा यांनी वडाळी, किरणनगर येथील प्रचार सभेत दिली. बेलोरा विमानतळाची रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे त्या म्हणाल्या.
लोकसभेच्या पटलावर तापी धरण येऊ देणार नाही
धारणी : मेळघाटवासीयांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असलेल्या तापी धरणाचा मी पुरेपूर विरोध करीन आणि लोकसभेत हा मुद्दा येऊच देणार नाही, अशी ग्वाही नवनीत राणा यांनी धारणी येथे दिली. अभिनेता सुनील शेट्टी यांनी सभेपूर्वी १० च्या सुमारास धारणीच्या प्रमुख मार्गाने रोड शो केला. नवनीत राणा यांना बळ द्या, मी पुन्हा मेळघाटात येईल, असे शेट्टी म्हणाले.

Web Title: Tavasa pulls sub-divisional offices here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.