चहालाही २० रुपये; ६०० रुपयांत निराधार जगणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:37 AM2019-06-26T01:37:53+5:302019-06-26T01:39:03+5:30

केंद्र सरकारकडून २०० रुपये, तर राज्य सरकारकडून ४०० रुपये असे मिळून विधवा, परिक्तत्या, निराश्रित, निराधारांना दरमहा ६०० रुपये मानधन दिले जाते. आजमितीला चहा घ्यायचे म्हटले तरी २० रुपये लागतात. म्हणजेच महिन्याभराच्या चहाचेच मानधन मिळणार का? या निराधारांनी इतर गरजांसाठी पैसा आणावा कोठून?

Tea for Rs 20; How to survive in Rs 600? | चहालाही २० रुपये; ६०० रुपयांत निराधार जगणार कसे?

चहालाही २० रुपये; ६०० रुपयांत निराधार जगणार कसे?

Next
ठळक मुद्देलोकसभेत नवनीत राणा : दरमहा दोन हजार रूपये द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र सरकारकडून २०० रुपये, तर राज्य सरकारकडून ४०० रुपये असे मिळून विधवा, परिक्तत्या, निराश्रित, निराधारांना दरमहा ६०० रुपये मानधन दिले जाते. आजमितीला चहा घ्यायचे म्हटले तरी २० रुपये लागतात. म्हणजेच महिन्याभराच्या चहाचेच मानधन मिळणार का? या निराधारांनी इतर गरजांसाठी पैसा आणावा कोठून? त्यांनी जगावे कसे, असा प्रश्नांचा भडिमार करून खासदार नवनीत राणा यांनी या घटकाला मानधन वाढवून दोन हजार रुपये करण्याची मागणी लोकसभेत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका पक्षाचे नव्हे, देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी या मु्द्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही नवनीत राणा यांनी सामान्यांच्या मुद्द्यांवर लक्ष वेधताना स्पष्ट केले. नवनीत राणा यांच्या तेजतर्रार संभाषणाच्या वेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी त्यांना कौतुकाने न्याहाळत होत्या.
खासदार नवनीत राणा यांनी प्रारंभी पंतप्रधान आवास योजनेत महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याची बाब उपस्थित केली. उत्तर प्रदेशाला २२ लाख घरकुुलांचे लक्ष्य दिले आहे. ते तीन वर्षांत पूर्ण करावे लागणार आहे.
महाराष्ट्र देशाचे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असताना, आवास योजनेत टार्गेट पाच लाख आहे. हा फरक नवनीत राणा यांनी लक्षात आणून देत, पंतप्रधान आवास योजनेचे महाराष्ट्रालाही २२ ते २५ लाख लक्ष्य असावे, अशी मागणी केली. गरीब, विधवा, निराधार, परिक्तत्या, निराश्रित आबालवृद्धांना मिळणाºया तोकड्या अनुदानावर त्या लोकसभेत कडाडल्या. श्रावण बाळ योजनेतून केंद्र आणि राज्य सरकार असे दोन्ही मिळून दोन हजार रुपये मानधन महिन्याला मिळावे, अशी मागणी खासदार नवनीत राणा केली.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ खासदारांचे लक्ष वेधून त्या म्हणाल्या, आम्ही ‘यंग खासदार’ आहोत. पहिल्यांदा निवडून आलो आहोत. आपण मिळून विकास करूया.

Web Title: Tea for Rs 20; How to survive in Rs 600?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.