चहा चोरून-लपून तर दारू खुलेआम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:14 AM2021-05-21T04:14:04+5:302021-05-21T04:14:04+5:30
संजय खासबागे पान २ चे लिड वरूड : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदीतील कडक निर्बंध २२ मे रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू ...
संजय खासबागे
पान २ चे लिड
वरूड : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदीतील कडक निर्बंध २२ मे रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला. त्यात सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार घरपोच सेवा सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. असे असताना दारू दुकानासमोर ग्राहकांची होत असलेली गर्दी त्या आदेशाचा बोजवारा उडवणारी ठरली आहे. चहा चोरून लपून तर दारू खुलेआम, असे वरूड तालुक्यातील चित्र आहे.
राज्य सरकारने लॉकडाऊन? जाहीर करून दुकानदारी बंद पाडली. परंतु, बारवाल्यांना होम डिलिव्हरी सुरू करून आर्थिक कुरण मोकळे केले. यावर नियंत्रण ठेवणारे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी हात ओले करून दारूची बेभाव विक्री करणाऱ्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. मात्र, पोटासाठी चहा विकणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारून जेरीस आणले जात आहे. त्यामुळे हा कसला लॉकडाऊन, असा सामान्यांचा प्रश्न आहे.
रोजगार गेल्याने हजारो कुटुंब उपाशी राहून दिवस कंठत असून, याकडे कुणाचे? लक्ष नाही. लहान-मोठ्या उद्योजकाचे, दुकानदारांचे रोजगार हिरावले. यामुळे अनेकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. चहा, पानटपऱ्या, उपाहारगृहांवर सक्तीची बंदी आणून पार्सल सुविधा सुरू केली. परंतु, खाद्यपदार्थ घेणाऱ्यांनी रस्त्यावर बसून खायचे काय, हा प्रश्न आहे. मात्र, बारसमोर दारू खुलेआम चढ्या भावाने मिळते. खायला अन्न आणि प्यायला पाणीसुद्धा मिळत नाही. मग दारूच आगाऊ दराने का विक्री केली जाते, असा प्रश्न अनेकांचा आहे. गरिबांचा रोजगार गेला अन् बारवाल्यांचा रोजगार सुरू आहे. हप्तेखोरीमुळे दारू मोठ्या प्रमाणावर विकली जात असताना नियंत्रण कुणाचे, हा प्रश्न आहे. जीवनाश्यक वस्तू विकता येत नाही. मात्र, दारू विक्रीला परवानगी आणि तीही घरपोच सेवेला हा दुजाभाव कसा? हा कसला लॉक डाऊन? सर्वसामांन्यांना पेट्रोल मिळत नाही. मात्र, धनदांडगे, राजकारण्यांना पेट्रोल कसे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
बॉक्स
वरूड तालुक्यात सात हजार पार
जिल्ह्यातील १४ तालुक्यांच्या तलनेत वरूड तालुक्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण आहेत. येथील रुग्णसंख्या ७१०० चे वर पोहोचली आहे. मृत्यूचा आकडा देखील भयावह आहे. मात्र, तरीही दारू दकानांवरील गर्दी कमी झालेली नाही.
हा आहे आदेश
सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार घरपोच सेवा सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे आदेश आहेत.
कोट यायचा आहे पालिका मुख्याधिकारी