फुटपाथवर बनायचा चहा, वडे अन्‌ कांदाभजी; टपऱ्या उखडून फेकल्या!

By प्रदीप भाकरे | Published: July 19, 2024 05:02 PM2024-07-19T17:02:00+5:302024-07-19T17:06:20+5:30

Amravati : कोर्ट, जिल्हा परिषद परिसराने मोकळा श्वास घेतला, महापालिका उपायुक्तांचा दणका

Tea, Vade and Kandabhaji made on the pavement; The steps were uprooted and thrown! | फुटपाथवर बनायचा चहा, वडे अन्‌ कांदाभजी; टपऱ्या उखडून फेकल्या!

Tea, Vade and Kandabhaji made on the pavement; The steps were uprooted and thrown!

प्रदीप भाकरे
अमरावती :
गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा न्यायालय व जिल्हा परिषदेच्या आवाराबाहेर चहा टपरी व नाश्त्याच्या गाडींचे अनिर्बंध अतिक्रमण झाले होते. तेथील फुटपाथ अतिक्रमणधारकांनी कह्यात घेतला होता. जिल्हा परिषदेच्या दोनही प्रवेशद्वारांलगत लागलेल्या टपरींवर चहा पिणारे व नाश्ता करणाऱ्या लोकांची गर्दी थेट रस्त्यावर येत असल्याने तेथे काही घटना तर घडली नसावी ना, अशी शंका घेण्याइतपत तेथे गर्दी होत होती. त्या अतिक्रमणांवर गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने दमदार कारवाई केली. तेथील अतिक्रमण दूर सारण्याचे निर्देश महापालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी दिले होते. 
             

काही दिवसांपासून तेथील फुटपाथवरच खाद्यपदार्थ बनवून ते तेथेच विकले जात होते. फुटपाथ गायब झाला होता. ती बाब लक्षात आल्यानंतर उपायुक्त माधुरी मडावी यांनी तेथील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे निर्देश पथकाला दिले. त्यानुसार अतिक्रमण पथकप्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे, निरीक्षक अनसार अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट परिसर व जिल्हा परिषद ऑफिससमोरील अतिक्रमित साहित्य जप्त करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. तसेच यापुढे अतिक्रमण करून हातगाडी वा फुटपाथ गिळंकृत न करण्याच्या सूचना अतिक्रमणधारकांना देण्यात आल्या. वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास दैनंदिन कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारादेखील देण्यात आला.

नाल्यांवरील अतिक्रमण काढले
सोबतच, शहरातील विविध मोठे व छोटे नाले व प्रभागातील नालीवर बांधकाम केलेले अतिक्रमित रपटे व अन्य बांधकाम देखील काढून टाकण्यात आले. अंबादेवी परिसरातील एका दुकानदाराने रोड साइडला अतिक्रमण केले असून, त्या दुकानदारांवर अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. सोबतच, शहराच्या विविध भागांत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जाणार आहे.

Web Title: Tea, Vade and Kandabhaji made on the pavement; The steps were uprooted and thrown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.