आदिवासीविरोधी शासनाला धडा शिकवा
By admin | Published: August 12, 2016 12:14 AM2016-08-12T00:14:48+5:302016-08-12T00:14:48+5:30
दोन वर्षांत राज्य व केंद्र शासनाने आदिवासींना योजनांच्या लाभापासून पूर्णत: वंचित ठेवले आहे.
बबलू देशमुख यांचे प्रतिपादन : काँग्रेसचा मेळावा
परतवाडा : दोन वर्षांत राज्य व केंद्र शासनाने आदिवासींना योजनांच्या लाभापासून पूर्णत: वंचित ठेवले आहे. अशा या नरकासूर शासनाला आता धडा शिकवा, सर्व योजनांचा लाभ बंद केल्याने शेतकऱ्यांसह आदिवासी, दलित अल्पसंख्याकांच्या जिवावर उठलेल्या शासनाला भररस्त्यात फाशी देण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले. ते आयोजित चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत बोलत होते.
शेतकरी आत्महत्या मागील दोन वर्षांत १५ पटीने वाढल्या आहेत. काँग्रेस शासनात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आता काय करायचे, हे तुम्हीच ठरवा. मेळघाटात कोट्यवधी रुपयांची कामे मागील शासनाने केली. माजी आमदार केवलराम काळे यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. परंतु आता तर मेळघाटचे आमदार कोण? हे शोधायची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले.
अध्यक्षांनी मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे, सभापती दयाराम काळे, महेंद्रसिंग गैलवार, वनमाला खडके, कैलास आवारे, आसीफभाई, रजनी बेलसरे, अजीजभाई, जयंत खडके, राजेश मांगलेकर, भाष्कर हरमकर, सुषमा मालवीय, गौरव काळे, चंदुलाल बेलसरे, बन्सी जामकर, गौरव काळे, अमोल बोरेकार, राहुल येवले, राजाभाऊ टवलाकर, प्रशांत देशमुख, मधुकर नाकट, श्रीकृष्ण सगणे, विनायक ठाकरे, हिरुजी हेकडे, पीयूष मालवीय, मिश्रीलाल झाडखंडे, शैलेश म्हाला, बाबू टेकाडे, सागर व्यास, विक्की राठोडसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष मिश्रीलाल झाडखेडे, श्रीकृष्ण सगणे, आभार सागर व्यास यांनी मानले.
यावेळी सुनील उईके यांनी भाजपातून तर कमला कास्देकर यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (तालुका प्रतिनिधी)