व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या शिक्षिकेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 06:00 AM2019-11-16T06:00:00+5:302019-11-16T06:00:49+5:30
जियाउल्ला खान व फिरदौसची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना शुक्रवारी नागपुरी गेट ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत यांच्या पथकाने जिल्हा व सत्र न्यायालय (८) एस.ए. सिन्हा यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाकडून सहायक सरकारी वकील मंगेश भागवत यांनी बाजू मांडून दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मदरसा शनिवारपासून सुरू होणार आहे. मुली मदरशात आल्यावर त्यांचे बयाण नोंदवायचे आहे.
अमरावती : लालखडी स्थित मदरशाचा अध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानच्या समर्थनार्थ मुलींचे व्हिडीओ व्हायरल करणाºया शिक्षिकेस नागपुरी गेट पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. महवीश खान अहमद खान (२०, रा. नेरपिंगळाई) असे महिला आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी मुख्य आरोपी जियाउल्ला खानला २० नोव्हेंबर, तर त्याची सहकारी फिरदौसजहाँला २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
जियाउल्ला खान व फिरदौसची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना शुक्रवारी नागपुरी गेट ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत यांच्या पथकाने जिल्हा व सत्र न्यायालय (८) एस.ए. सिन्हा यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाकडून सहायक सरकारी वकील मंगेश भागवत यांनी बाजू मांडून दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मदरसा शनिवारपासून सुरू होणार आहे. मुली मदरशात आल्यावर त्यांचे बयाण नोंदवायचे आहे. पीडित मुलीचे नाव उघड केलेला व्हिडीओ व्हायरल करणाºया महिलेची चौकशी करायचा आहे. जियाउल्ला खान, फिरदौस व ताब्यात घेतलेल्या महिलेची चौकशी करायची आहे, असे मुद्दे पोलिसांकडून सरकारी पक्षाने न्यायालयासमक्ष मांडून आरोपींची कोठडीची मागणी केली.
दरम्यान, नागपुरी गेट पोलिसांनी या प्रकरणात महवीशविरुद्ध कलम २३ पोक्सो वाढविले आहे.
आवाजावरून शिक्षिकेची ओळख
मुफ्ती जियाउल्ला खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ मदरशातील काही मुलींचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. एका व्हिडीओत चक्क पीडित मुलीचे नाव उघड करण्यात आले होते. आवाजावरून शोध घेऊन पोलिसांनी महवीश खान या शिक्षिकेला शुक्रवारी अटक केली.
पीडितीचे बयाण नोंदविले
लैंगिक अत्याचार झालेली पीडित १५ वर्षीय मुलगी बयाण देण्यास असमर्थ होती. त्यामुळे तीचे बयाण पोलिसांनी नोंदविले नव्हते. शुक्रवारी पीडित मुलीचे कलम १६४ अन्वये न्यायालयासमक्ष बयाण नोंदविण्यात आले.