शिक्षक समितीने उपसले आंदोलनाचे हत्यार
By admin | Published: March 12, 2016 12:16 AM2016-03-12T00:16:26+5:302016-03-12T00:16:26+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संबंधात शासनाच्या अन्यायकारक धोरणाला विरोध,
शासकीय धोरणांचा विरोध : १४ मार्च रोजी राज्यव्यापी धरणे
अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संबंधात शासनाच्या अन्यायकारक धोरणाला विरोध, जिल्हास्तरीय समस्यांकडे शिक्षण विभागाचे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ १४ मार्च रोजी म.रा. प्राथमिक शिक्षक समितीद्वारा राज्यस्तरीय प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कचेरीसमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाद्वारा २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. तसेच १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना १९८२ ची मुळची सेवानिवृत्त योजना लागू करावी यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत पुसदकर,राज्य प्रतिनिधी राजेश सावरकर, महिला प्रतिनिधी अलका देशमुख व गोकुलदास राऊत आदिंनी केले आहे.