समायोजनाविरोधात शिक्षक दाम्पत्याचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:29 AM2018-04-20T01:29:43+5:302018-04-20T01:29:43+5:30
पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अंगोडा येथील जिल्हा परिषदेची कमी पटसंख्या असलेली शाळा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील दोन शिक्षकांचे टाकळी जहागीर येथे समायोजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अंगोडा येथील जिल्हा परिषदेची कमी पटसंख्या असलेली शाळा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील दोन शिक्षकांचे टाकळी जहागीर येथे समायोजन करण्यात आले. मात्र, येथेही पटसंख्या कमी असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. समायोजनाच्या प्रक्रियेत शंभर टक्के दिव्यांग असलेल्या मुलांच्या शिक्षक आईवर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अन्याय केला आहे. या अन्यायाविरोधात ज्योती धाकडे व सत्येंद्र अभ्यंकर यांनी गुरुवारपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे.
कमी पटसंख्येचे कारणाहून अंगोडा येथील झेडपी शाळा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या शिक्षकांचे टाकळी येथील शाळेत समायोजन करण्यात आले. परंतु, या ठिकाणीही कमी पटसंख्येमुळे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे सन २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात रिक्त असलेल्या शाळेवरच म्हणजेच रायपूर पांढरी या शाळेवर होणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षण विभागाचे शिक्षिका धाकडे यांना न्याय दिला नाही. त्यांचा एकुलता एक मुलगा शंभर टक्के दिव्यांग आहे. त्याची दिनचर्या ही पती व पत्नीलाच करावी लागते. ॉ दिव्यांग मुलाचे पालक असलेल्या शिक्षक दाम्पत्याला न्याय मिळत नसल्याने ज्योती धाकडे व सत्येंद्र अभ्यंकर यांनी टाकळी जहागीर येथील स्थानांतरण रद्द करून प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या रायपूर पांढरी येथील शाळेत रिक्त असलेल्या जागेवर नियमित करण्याची मागणी उपोषणाच्या माध्यमातून केली आहे. सीईओ यावर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.