शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षक महासंघाचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:21 PM2018-03-17T22:21:07+5:302018-03-17T22:21:07+5:30
वांरवार पाठपुरावा करूनही जीपीएफ व डीसीपीएस हिशेबाच्या पावत्या वितरित न केल्यामुळे शिक्षक महासंघाद्वारा शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला शेखर भोयर यांच्या नेतृत्वात ठिय्या देण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : वांरवार पाठपुरावा करूनही जीपीएफ व डीसीपीएस हिशेबाच्या पावत्या वितरित न केल्यामुळे शिक्षक महासंघाद्वारा शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला शेखर भोयर यांच्या नेतृत्वात ठिय्या देण्यात आला.
जीपीएफ व डीसीपीएस हिशोबाच्या पावत्या संदर्भात ठोस निर्णय लागल्याशिवाय शिक्षण उपसंचालक कार्यांलयातून माघार घेणार नाही असे ही मत शेखर भोयर यांनी व्यक्त केले.
शिक्षण उपसंचालकांनी २१ आॅगस्ट २०१७ पत्रान्वये विभागातील सर्व शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षक यांना आदेशीत केले मात्र या आदेशाचे पालन झाले नाही. शासनाने सन २०१२-१३ पासून ते २०१६-१७ पर्यंतच्या जीपीएफ पावत्या वितरित केल्या नाही. शासनाने दोन नोव्हेंबर २००५ पासून सेवेत रुजू झालेल्या शिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांना नवी अंशदायी पेंशन योजना लागू केली आहे. यामधूनही शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात येत आहे. कपात किती झाली. याच्या पावत्या कर्मचाºयांना मिळाल्या नाही. सेवानिवृत्त तसेच मृत कर्मचाºयांना पाल्यांनाही याचा लाभ मिळाला नाही. या विरोधात शिक्षक महासंघाने रणशिंगे फुंकले आहे पावत्या मिळाल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नसल्याचे व शासनालाही स्वस्थ बसू देणार नसल्याचे भोयर यांनी सांगितले.
यावेळी ए.के. मेश्राम, पी.एच. आडे, ए. जे. लढ्ढा, एस.आर. सुरजुसे, सी.बी. ढंगळे, एल.आर. सारडा, एन.आर. भट्टड, एन.व्ही. देशमुख, एन. टी. देशमुख, एस.डी. पांडे, व्ही. यू. उरके, पी.आर. राठी, आर.एन. राठी, आर.एन. गांधी, आशिष काळबांडे, नीलेश नागगोत्रे, अविनाश अनासान, संघपाल समदुरे, रवींद्र धांडे, संदीप भगत, विजय बडोदे, विठ्ठल दळवी, कृष्णकांत धुळे, आर.जे. लोखंडे, अनिल बडगुजर, सुरेश गांजरे, शैलेश काळे, डी.आर. बंगळे, ए.आर. नखाते, निखिल घायवन, अतुल पारळे, संजू जामठे आदी उपस्थित होते.