शिक्षकांनो, लसीकरण करून घ्या,पाच सप्टेंबरची डेडलाईन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:26 AM2021-09-02T04:26:50+5:302021-09-02T04:26:50+5:30
शासनाच्या सूचनेमुळे शिक्षक ,कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी धावपळ अमरावती : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यातील शासकीय तसेचखासगी कर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबरपर्यत लसीकरण पूर्ण ...
शासनाच्या सूचनेमुळे शिक्षक ,कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी धावपळ
अमरावती : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यातील शासकीय तसेचखासगी कर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबरपर्यत लसीकरण पूर्ण करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी पहायला मिळत आहे. परंतु काही ठिकाणी लस उपलब्ध नसल्याने शिक्षक, कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी अडचणी येत आहेत.
ग्रामीण भागातील शाळा शासनाने सुरू केल्या.त्यावेळी जर कोविड १९ ची लस घेतल्याशिवाय शाळेत प्रवेश नाही. यावर शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने भर दिला असता तर शंभर टक्के लसीकरण झाले असते. आरोग्य विभागाकडून शिक्षकांच्या लसीकरणाकरिता कुठलीही वेगळी व्यवस्था केली नाही. परंतु वरिष्ठ पातळीवरून शिक्षकांच्या लसीकरणासंदर्भात आदेेश काढले जात आहे. जिल्ह्यात लसीचाही अनेक वेळा तुटवडा निर्माण होत असल्याने बहुतांश शिक्षक व कर्मचारी लसीकरणापासून वंचित आहेत.राज्यात सद्यस्थितीत १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. शाळा सुरू करण्याची परिस्थिती लक्षात घेता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ५ सप्टेंबरपर्यंत लसीकरण करून घ्यावे, असे निर्देश आहेत. त्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांना आता लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. याकरिता आता शिक्षकांना लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध असणे आवश्यक आहे.
बॉक्स
आतापर्यंत झालेले लसीकरण
शासकीय शाळांतील शिक्षक ७७०-६७०
खासगी शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचारी -१०९९१-८९९१
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक ५९६८-५०६८
नगरपरिषद शाळांतील शिक्षक ६१४-५१४
बॉक्स
म्हणून घेतली लस
पहिला डोज व दुसरा लसीचा डोज शाळा सुरू होताच शिक्षण विभागाच्या सूचनेप्रमाणे घेतला आहे.परंतु कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी शिक्षकांन करीता लसीकरण कॅम्प सुरू करण्याची आमची मागणी आहे.
सुनील कुकडे
शिक्षक
कोट
कोरोना काळात अनेक शिक्षकांचा मृत्यृ झाला. त्यामुळे शिक्षकांचे शंभर टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे. म्हणून शिक्षकांनी शिक्षक दिनापूर्वी लसीकरण करून घ्यावे.
- राजेश सावरकर,
मुख्याध्यापक
कोट
जिल्हा समन्वयक
कोरोना लसीकरणाचे नियमित सत्र सुरू आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्राधान्य आहे. ज्यांनी लस घेतलेली नाही अशांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे.
- विनोद करंजीकर,
जिल्हा समन्वयक